मिळालेल्या माहितीनुसार, बीड तालुक्यातील काटवटवाडी गावात ही घटना घडली. या गावात राहणारे आनंद खोड यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आरोही खोड असं या चिमुरडीचं नाव आहे. आरोही आता कुठे रेंगळायला लागली होती. घरात मोठ्या भावासाठी चॉकलेट आणलं होतं. आरोही घरात खेळत होती, तेव्हा चॉकलेट हे खेळण्यासाठी चिमुकलीच्या समोर टाकलं. खेळता खेळता आरोहीने ते चॉकलेट उचलून तोंडात घातलं. आरोहीने चॉकलेट तोंडात घातल्याचे समाजातच बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र हातात कव्हर आलं. काही समजण्याच्या आत चॉकलेट घशात अडकलं.
advertisement
आरोहीचा श्वास कोंडला गेला, त्यामुळे घाबरलेल्या कुटुंबीयांनी तिला घेऊन तातडीने शासकीय रुग्णालय गाठलं. पण डॉक्टरांकडे नेत असतानाच वाटेतच आरोहीचा दुर्दैवी मृत्यू झाला होता , असं आरोहीचे चुलते अमोल खोड यांनी सांगितलं.
स्ट्रॉबेरी चॉकलेट दोन्ही मुलांनी खाल्ली पण..
बाहेर गावाहून आल्यानंतर मुलगा पाठीमागे लागला होता म्हणून त्याच्यासाठी चॉकलेट दिलं. स्ट्रॉबेरी चॉकलेट दोन्ही मुलांनी खाल्ली होती. मात्र एक खेळण्यासाठी आरोहीच्या समोर एक चॉकलेट टाकलं होतं. तिने उचलून तोंडात घातलं की, तोंडातले चॉकलेट बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला मात्र चॉकलेटचे कव्हर हातात आलं आणि चॉकलेट तोंडात गेलं, काही क्षणात बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. उपचारासाठी आम्ही धावपळही केली मात्र यश आले नाही, असं सांगताना आरोहीचे चुलते अमोल खोड यांना अश्रू झालं. शासकीय रुग्णालयामध्ये कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता.
दरम्यान, 18 महिन्याचे बाळ होईपर्यंत बाळाला द्रव्य रूपातच खावू घालावे, चॉकलेट आणि इतर पदार्थ देऊ नयेत, असा सल्ला वैद्यकीय बालरोग तज्ञांनी दिला आहे.