सुहास जोशी हे आयुष्यभर शिक्षक म्हणून कार्यरत राहिले. मुख्याध्यापक पदावर असताना त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि समाजातील विविध घटक यांच्याशी सतत संवाद साधला. पत्र हेच त्यांच्या संवादाचं प्रमुख माध्यम होतं. निवृत्तीनंतरही त्यांनी ही सवय जपली आणि ती एक संस्कारमूल्य बनवली. त्यामुळे आज वयाच्या 86व्या वर्षी त्यांच्या पत्रलेखनाचा आकडा तब्बल 1 लाखांवर पोहोचला आहे.
advertisement
पत्रव्यवहाराच्या माध्यमातून त्यांनी केवळ वैयक्तिक संवादच नाही तर प्रशासन, शैक्षणिक संस्था, सामाजिक संघटना आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर व्यक्तींशीही संपर्क साधला. अनेकदा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडचणी सोडवण्यासाठी, कुणाच्या समस्येला न्याय मिळवून देण्यासाठी किंवा एखाद्या कल्पनेला योग्य व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी पत्रांचा आधार घेतला.
टपाल विभागाकडून करण्यात आला गौरव
मागील 65 वर्षांपासून पत्रलेखनचा छंद जोपासणाऱ्या सुहास जोशी यांचा टपाल विभागाकडून गौरव करण्यात आला आहे. पत्रलेखनाच्या अनोख्या कामगिरीचा सन्मान म्हणून टपाल विभागाच्या टपाल तिकीटावर सुहास जोशी यांचं छायाचित्र आता दिसणार आहे.