मृत्यूमुखी पडलेल्यांचा वयोगट ० ते १६ वर्षे असा आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेच्या (NIV) चमूने नागपूरात तपासणी केली असली तरी अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. दरम्यान, नागपुरातील विविध रुग्णालयांत चौदा रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मेंदूज्वराच्या मृत्यू झालेल्या मुलांचे नमुने घेतले
advertisement
एनआयव्हीच्या पथकानेशहरातील मेडिकल, मेयो, एम्स या नावाजलेल्या राज्य व केंद्र सरकारच्या रुग्णालयालाही भेट दिली. येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडून तीव्र तापाच्या रुग्णांची माहिती घेत संशयित मेंदूज्वराच्या मृत्यू झालेल्या मुलांचे नमुने घेतले. तसेच संशयित रुग्ण राहणाऱ्या मानकापूर परिसरातील डास व प्राण्यांचे नमुनेही गोळा केले गेले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाने या रुग्णांशी माध्यमांना भेटण्यास नकार दिला असून, तपासणी अहवाल आल्यानंतरच आजाराचे खरे कारण स्पष्ट होणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.
मेंदूज्वराची लक्षणे
मेंदूज्वर (अॅक्यूट एन्सेफेलाइटिस सिंड्रोम) म्हणजे मेंदूला होणारी तीव्र जळजळ किंवा सूज आहे. ज्याची लक्षणे
अचानक तीव्र तापाने सुरू होतात. त्यात मानसिक अवस्थेत बदल (गोंधळ, चक्कर येणे), झटके येणे किंवा बेशुद्ध पडणे यांचा समावेश असतो. काहीवेळा व्यक्तीला बोलता येत नाही किंवा चालताना अडचण येऊ शकते. विशेषतः १५ वर्षाखालील मुलांना या आजाराचा जास्त धोका संभवतो. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन करण्यात आले आहे