निकालानंतर गोंधळ आणि आरोप
मतमोजणीच्या दिवशी सायंकाळच्या सुमारास निकाल जाहीर झाल्यानंतर पराभूत उमेदवाराच्या घरासमोर मोठा गोंधळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. विजयी उमेदवाराच्या काही समर्थकांनी घोषणाबाजी करत घरासमोर धिंगाणा घातला. याचदरम्यान काही जणांनी जबरदस्तीने घरात प्रवेश केल्याचा, अश्लील वर्तन केल्याचा तसेच घराला आग लावण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे.
advertisement
भाजप उमेदवाराची तक्रार
या प्रकरणी भाजपच्या उमेदवार पुष्पा ताजनपुरे यांनी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, काही कार्यकर्त्यांनी ज्वलनशील पदार्थ फेकले तसेच घरात गोंधळ घालत अश्लील कृत्य केल्याचे आरोप आहेत. या तक्रारीच्या आधारे उपनगर पोलिसांनी पूजा नवले, त्यांचे पती प्रवीण नवले आणि इतर १५ ते २० संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, नाशिक महानगरपालिकेच्या ३१ प्रभागांतील एकूण १२२ जागांसाठी गुरुवारी (दि. १५) मतदान प्रक्रिया पार पडली. आणि शुक्रवारी १७ जानेवारीला निकाल जाहीर झाला. शहरात एकूण ५६.७६ टक्के मतदानाची नोंद झाली. २०१७ च्या महापालिका निवडणुकीत ६१.६० टक्के मतदान झाले होते.
