४० दिवसात कोंबड्यांची वाढ होत असल्याने पुन्हा नव्याने कोंबड्यांची पिल्ले भरली जातात त्यावेळी त्यांनी पिल्ले निवडताना आणि औषधे वगैरे कोणती घ्यावी याबद्दल माहिती सांगितली.व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी काय असायला हव्यात याबद्दल त्यांनी सुरक्षित, हवेशीर आणि योग्य जागेची निवड करावी. प्रतिष्ठित पुरवठादारांकडून उच्च प्रतीची आणि निरोगी पिल्ले निवडावीत मांस किंवा अंडी यापैकी ज्यासाठी व्यवसाय करायचा आहे, त्यानुसार योग्य जात निवडावी. कुक्कुटपालन व्यवसाय पोल्ट्री हाऊसच्या आकार आणि प्रकारानुसार विविध प्रकारची उपकरणे वापरतील.
advertisement
पेर्चेस, फीड कंटेनर, वॉटरिंग गॅझेट्स, हीटर, फॉगर्स, बेबी चिकन गार्ड, लेइंग हाऊस आणि ब्रूडिंग हॉवर ही चिकन हाउस उपकरणांची महत्त्वपूर्ण उदाहरणे आहेत. हा व्यवसाय करताना कोंबड्यांच्या आजारासोबत आपल्याला त्या आजाराची लागण होणार नाही हे ही त्यांनी सांगितले.मुख्य म्हणजे कोंबड्यांची पिल्ले जस लहान मुलांना पोलिओ सारखे आजार भेडसावतात तसे त्या पिल्लांना ही प्रत्येक आठवड्याला डोळ्यातून ड्रॉप स्वरूपात औषध द्यावे लागते.आणि कधीतरी एक कोंबडीच पिल्लू मरण पावलं तर त्यात प्रत्येकाला लागण होते त्यासाठी व्हिमिनिटी पॉवर वाढवण्यासाठी इंजेक्शन द्यावे लागते.
यामुळे त्यांची आजारावर प्रतिकार करण्याची क्षमता वाढते किंवा पूर्ण पिल्ले एक्सेजं करावे लागतात.त्यानंतर त्यांची रँकिंग करणे महत्वाचा भाग आहे .ही रँकिंग दिवसातून २ते३वेळा करणे जरुरीचं आहे.त्यामुळे येणारा वास आणि होणारा आजार टाळता येतो.या सगळ्यांची मेहनत पहाता विजय शेतकरी हे स्वतः सगळ करतात.स्वतःच्या मेहनतीत इथे कोणी कामगार नाही किंवा साफ करायला नोकर नाहीत ते स्वतः ही पूर्ण पोल्ट्री हाऊस सांभाळतात.