TRENDING:

भावा, हे कोल्हापूर हाय! मिरवणुकीत चप्पल तुटली, तरीही पोरं नाचली; मनपा 'त्या' 10 ट्राॅली चपलांचं करणार काय?

Last Updated:

Kolhapur News : कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील एक खास ओळख म्हणजे रस्त्यावर पडलेल्या चपलांचा ढिग. यंदाही हे चित्र कायम होते आणि...

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Kolhapur News : कोल्हापूरच्या गणेश विसर्जन मिरवणुकीतील एक खास ओळख म्हणजे रस्त्यावर पडलेल्या चपलांचा ढिग. यंदाही हे चित्र कायम होते आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तब्बल दहा ट्रॉली भरून चपला गोळा केल्या आहेत. पण यंदा एक वेगळा निर्णय घेण्यात आला आहे. या सर्व चपला आता सिमेंट कारखान्यांमध्ये जळण्यासाठी वापरल्या जाणार आहेत.
Kolhapur News
Kolhapur News
advertisement

चपलांचा ढिग का जमा झाला?

गणपती विसर्जन मिरवणुकीत प्रचंड गर्दी आणि ढकलाढकली होते. याच गोंधळात अनेक तरुण आणि तरुणांच्या पायातील चपला निसटून पडल्या. अनेकांना नाचण्याच्या नादात आपली चप्पल कुठे पडली, याचा पत्ताच लागला नाही. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने सफाई मोहीम राबवली तेव्हा हे चकित करणारे चित्र समोर आले.

महापालिकेच्या आरोग्य विभागाने या चपलांचे ढिग तातडीने उचलून घेतले. जवळपास दहा ट्रॉली इतका हा कचरा होता. आता या सर्व चपला कसबा बावडा येथील झूम प्रकल्पाजवळ जमा करून ठेवण्यात आल्या आहेत. या चपला घेऊन जाण्यासाठी महापालिकेने सिमेंट आणि साखर कारखान्यांशी संपर्क साधला आहे.

advertisement

प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र आवश्यक

सिमेंट कारखान्यांमध्ये सिमेंट तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात ज्वलन प्रक्रिया केली जाते. चपला जास्त वेळ जळत राहतात, त्यामुळे, अनेक सिमेंट कंपन्यांना अशा वस्तूंनी गरज असते. मात्र, महापालिकेने या चपला केवळ त्याच कारखान्यांना देण्याचे ठरवले आहे, ज्यांच्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रमाणपत्र आहे. सहाय्यक आयुक्त कृष्णा पाटील यांनी सांगितले की, "येत्या चार दिवसांत या चपला गरजू कंपन्यांना दिल्या जातील."

advertisement

हे ही वाचा : पितृपक्षात या 7 चुका अजिबात करू नका! अन्यथा पितृदोष होऊन भोगावे लागणार वाईट परिणाम

हे ही वाचा : PM Kisan योजनेच्या नियमांत मोठा बदल! शेतकऱ्यांमध्ये कुणाला मिळणार लाभ?

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भावा, हे कोल्हापूर हाय! मिरवणुकीत चप्पल तुटली, तरीही पोरं नाचली; मनपा 'त्या' 10 ट्राॅली चपलांचं करणार काय?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल