पश्चिम बंगालमधून येतंय वादळ
पश्चिम बंगालच्या खाडीतून पुढे सरकलेलं चक्रीवादळ हे ओडिसाच्या दिशेनं आलं आहे. त्याचा वेग 75 किमीपेक्षा जास्त होता. आज हळूहळू त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. उत्तरेकडे हे पुढे सरकण्याची शक्यता आहे. छत्तीसगढ आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या दिशेनं पुढे सरकू शकतं. त्यामुळे पुढचे 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असणार आहेत. हे वादळ कुठल्या दिशेनं किती वेगानं पुढे सरकत हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
अरबी समुद्राकडूनही धोका
दुसरं वादळ अरबी समुद्रात आलं आहे. मध्यरात्री या वादळाचा वेग वाढला आहे. उत्तर पश्चिम दिशेकडे हे सरकण्याची शक्यता आहे. त्यानंतर पश्चिम दिशेकडे सरकण्याची शक्यता आहे. पाकिस्तानच्या दिशेनंही कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचे आहेत.
कोकण पट्ट्यात काय स्थिती?
कोकणपट्ट्यात आज हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार आहे. मात्र कोकण वगळता संपूर्ण महाराष्ट्रात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. 5 ऑक्टोबर रोजी विदर्भात अति मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित महाराष्ट्रात ऊन आणि पाऊस पाहायला मिळेल. या दरम्यान 50 ते 70 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या परतीच्या प्रवासाचा मुहूर्त ठरला
6 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात हलक्या स्वरुपाचा पाऊस राहील. त्यानंतर हळूहळू पाऊस कमी होईल. मात्र वादळांमुळे ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाचं संकट राहणार आहे. याशिवाय ऑक्टोबर महिन्यात दमट उष्ण वातावरण राहील. तर ला निनाच्या परिणामांमुळे यावेळी थंडी देखील जास्त राहणार आहे. 7 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात पाऊस राहणार नाही. मात्र तोपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा काही जिल्ह्यांमध्ये देण्यात आला आहे.
मच्छिमारांसाठी हायअलर्ट
गुजरात आणि महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यालगच्या भागांमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. तर मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. २-३ दिवस महाराष्ट्रातील हवामानात वेगाने बदल होण्याची शक्यता आहे. दोन वादळांमध्ये महाराष्ट्रातील वातावरणाचे बदल दिसून येणार आहेत. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.