आदिलाबाद- पंढरपूर विशेष रेल्वे: विशेष आदिलाबाद - पंढरपूर विशेष रेल्वे गाडी क्रमांक 07613 हे 31 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत आदिलाबादहून सकाळी 08:30 मिनिटाला निघेल आणि दुसऱ्यादिवशी रात्री 02 वाजता पंढरपूरला पोहोचेल तर या आदिलाबाद पंढरपूर विशेष रेल्वे गाड्यांचे एकूण 2 फेऱ्या होणार आहे. तर उलट दिशेने गाडी क्रमांक 07614 पंढरपूरहुन 1 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत रोज रात्री 8 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी आदिलाबादला 12 वाजून 15 मिनिटाला पोहोचेल. तर या गाडीचे एकूण 2 फेऱ्या होणार आहेत.
advertisement
आदिलाबाद- पंढरपूर विशेष रेल्वे थांबे: आदिलाबाद पंढरपूर या विशेष रेल्वे गाडीला किनवट, बोधड़ी बुजुर्ग, धानोरा डेक्कन, सहस्त्रकुंड, हिमायतनगर, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी वैजनाथ, पानगाव, लातूर रोड, लातूर, हरंगुळ, औसा रोड, ढोकी, येडशी, धाराशिव, पांगरी, बार्शी टाऊन, शेंद्री, कुर्डूवाडी, मोडलिंब त्या स्टेशनला थांबे मिळणार आहे. तर प्रवाशांनी वैद्य टिकिटासह प्रवास करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
