गेल्या सात महिन्यांपासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला आता नवे वळण मिळाले आहे. गावकऱ्यांच्या पाठिंब्याने आणि सामाजिक सलोख्याच्या पायावर उभ्या असलेल्या या लढ्यात देशमुख कुटुंबियांसाठी न्याय मिळवण्याचा निर्धार अधिक दृढ झाला आहे. या काळात विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जाती-धर्मातील नागरिक एकवटले. या खटल्यासाठी सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी पुढाकार घेतला असून, त्यांनीच केस लढवावी अशी विनंती आज देशमुख कुटुंबियांनी त्यांना केली. निकम यांनीच संतोष देशमुख यांची केस लढवावी, ही आमची मनापासून विनंती आहे, असं भावनिक आवाहन धनंजय देशमुख यांनी केले आहे.
advertisement
वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या दोषमुक्तीच्या अर्जावर उज्वल निकम म्हणाले...
संतोष देशमुख यांच्या खुनातील आरोपी वाल्मिक कराड याने दोषमुक्तीसाठी न्यायालयात अर्ज केला होता, तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्याचा अर्ज फेटाळल्यानंतर दुसरा आरोपी विष्णू चाटे आणि इतर सर्व आरोपींनी आम्हाला या खटल्यातून वगळावे, असा अर्ज त्यांनी केला. मात्र यावर मी जोरदार हरकत घेतली. न्यायालयाला सांगितले की ही आरोपींची मोडस ऑपरेंडी आहे. एकदा दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर इतरही आरोपही सारखे सारखे अर्ज करतात. अशा रितीने वेळेचा अपव्यय करायचा. खटला लांबवत न्यायचा हा आरोपींचा प्रयत्न आहे. सगळ्या आरोपींना एकाच वेळेला दोषमुक्तीचा अर्ज करायचा असेल तर त्यांनी करावा, अशी विनंती आम्ही न्यायालयाला केली. त्याप्रमाणे आज न्यायालयाने विष्णू चाटेसह इतर उर्वरित आरोपींनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे. सगळ्या अर्जांना आम्ही खुलासा दिलेला आहे. वाल्मिक कराडने आज न्यायालयात जामिनीसाठी अर्ज केलेला आहे. त्याच्याही विरोधात आम्ही आमचे म्हणणे मांडणार आहोत.
