अहिल्यानगर जिल्ह्यात एकूण 11 नगरपरिषदा आणि 1 नगरपंचायत आहे. यातील सात ठिकाणी भाजपनं बाजी मारली आहे. दोन ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. किंवा विजयाच्या दिशेनं वाटचाल करत आहेत. एकेठिकाणी काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर आहे. मात्र संपूर्ण जिल्ह्यात कुठेच शरद पवार आणि अजित पवार गट दिसत नाहीये. राहुरीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या शहर विकास आघाडीने बाजी मारली असली तर ती तुतारी चिन्हावर निवडणूक लढली गेली नाही.
advertisement
अहिल्यानगर जिल्ह्याचा संपूर्ण निकाल...
1) राहता - भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.स्वाधीन गाडेकर विजयी
2) देवळाली प्रवरा - भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजीत कदम विजयी
3) नेवासा - शिवसेना शिंदे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. करण घुले विजयी
4) शिर्डी - भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार जयश्री विष्णू थोरात यांची विजयाकडे वाटचाल...
5) कोपरगाव - भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पराग संधान आघाडीवर
6) संगमनेर - संगमनेर सेवा समिती (अपक्ष) नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ.मैथिली तांबे यांची विजयाकडे वाटचाल..
7) श्रीरामपूर - काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार करण ससाणे यांची विजयाकडे वाटचाल...
8) राहुरी - शहर विकास आघाडीचे ( अपक्ष ) नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब मोरे आघाडीवर
9) श्रीगोंदा- भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुनीता खेतमालीस विजयी...
10) पाथर्डी - भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अभय आव्हाड विजयी...
11) जामखेड- भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार प्रांजल चिंतामणी यांना निर्णायक आघाडी...
12) शेवगाव- शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार माया मुंडे विजयी...
अहिल्यानगरमधील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायतीचा निकाल काय?
राहता नगरपालिका
राहाता नगरपालिकेवर विखे पाटलांचा झेंडा फडकला आहे. त्यांना आपला गड राखता आला आहे. इथं भाजपचे स्वाधीन गाडेकर बहुमताने विजयी झाले आहेत. राहातामधील 20 पैकी 19 जागेवर भाजप सेनेचा विजय झाला आहे. इथं विरोधकांना मिळाली अवघी एक जागा...
देवळाली प्रवरा नगरपालिका
इथं माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी सत्ता राखली राखली आहे. भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सत्यजित कदम विजयी झाले आहेत. जनतेने त्यांना दुसर्यांदा नगराध्यक्ष पदाची संधी दिली आहे. देवळालीत 14 जागेवर भाजपचा तर चार जागांवर काँग्रेसचा विजय झाला आहे.
नेवासा नगरपालिका
नेवासामध्ये माजी आमदार शंकरराव गडाख यांचा गड आला पण सिंह गेला अशी स्थिती आहे. इथं 17 पैकी 10 जागांवर गडाखांचे उमेदवार विजयी झाले आहेत. मात्र नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. 6 ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर एका जागेवर आम आदमी पार्टीचा विजय झाला आहे.
राहुरी नगरपालिका
राहुरीमध्ये आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या शहर विकास आघाडीचा विजय झाला आहे. नगराध्यक्षपदी बाबासाहेब मोरे बहुमताने विजयी झाले. तनपुरेंनी आपला गड राखला. 24 पैकी 17 जागेवर तनपुरेंचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर 7 जागेवर भाजपच्या नगरसेवकांचा विजय झाला आहे.
संगमनेर नगरपालिका
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरातांनी आपला गड राखला. संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष उमेदवार मैथीली तांबे सोळा हजार चारशे मतांनी विजयी झाल्या. शिवसेना भाजप युतीच्या सुवर्णा खताळ पराभूत झाल्या. संगमनेरमध्ये 30 पैकी 27 जागांवर संगमनेर सेवा समितीचा विजय झाला आहे. इथं केवळ एका ठिकाणी महायुतीला विजय मिळवता आला. इतर दोन ठिकाणी अपक्ष उमेदवार निवडून आले आहेत. मात्र ते उमेदवारही थोरात गटाचे आहेत.
