मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील पीडित वेदांत कुलट हा शहरातील एका महाविद्यालयात आठवीच्या वर्गात शिकतो. आज परीक्षा असल्याने तो दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास शाळेतून घरी आला होता. त्यानंतर खाजगी कामानिमित्त दुचाकी घेऊन बाहेर पडला होता. यावेळी शहरातील वीर सावरकर मैदान पोहोचताच वर्गातील मित्रांनी त्यांची गाडी अडवली. यानंतर एकाने बाळगलेला चाकू काढून थेट वेदांतच्या पाठीत खूपसला होता.त्यानंतर दोन्ही मित्रांनी घटनास्थळावरून पळ काढला होता.
advertisement
या घटनेनंतर वेदांतला रक्ताच्या थारोळ्यात पाहून घटनास्थळी स्थानिकांची गर्दी जमली. यावेळी तत्काळ पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली होती.त्यासोबत स्थानिकांनी तत्काळ वेदांतला रूग्णालयात दाखल केले होते.त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली होती. पण या हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या हल्ल्यात वेदांत कुलट यांच्या पाठीवर धारदार चाकूने गंभीर इजा झाली आहे.त्याच्यावर प्राथमिक उपचार पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले असून, पुढील उपचारासाठी त्याला अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.तसेच पोलिसांनी या घटनेचा तपास सूरू केला आहे. किरकोळ वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान या प्रकरणात शालेय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडे चाकू कुठून येतात असा सवाल उपस्थित होत आहे.तसेच चाकू जरी जवळ असला तरी दुसऱ्यावर हल्ला करण्याची मानसिकता कशी येते? असा सवाल आता पालक आणि पोलिसांना पडला आहे.