दरम्यान पुढे बोलताना अण्णा हजारे म्हणाले की, 'दहा-बारा वर्षांनी ते का बोलले मला माहीत नाही, परंतु कुणाचे भ्रष्टाचार प्रकरण बाहेर काढणं यात काही चुकीचं नाही, मला जे दिसलं त्यावर मी बोलत गेलो. आता बोलत नाही कारण माझं वय 88 वर्ष आहे, पण त्यांना आज अचानक कशी जाग आली हे मला माहिती नाही' असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील अण्णा हजारे यांच्यावर निशाणा साधला आहे. 'अण्णांबद्दल आम्हाला खूप आदर आहे, परंतु 2014 पूर्वी टुक वाजलं तरी अण्णा आक्रमकपणे आंदोलन करत होते, मात्र आता देशामध्ये बॉण्ड घोटाळा मणिपूर प्रकरण महाराष्ट्रामध्ये ॲम्बुलन्स घोटाळा या प्रश्नांवर अण्णांनी कधी बोलले नाही किंवा आंदोलन केलं नाही , यामुळे सोयीचे समाजकारण हे बरोबर नाही' असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
Location :
Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
First Published :
May 24, 2024 10:53 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
Anna Hazare : 'मी कुठल्याही पक्षाचा...'; शरद पवारांच्या टीकेवर अण्णांचा जोरदार पलटवार
