नेमकं काय म्हणाले हजारे?
अरविंद केजरीवाल यांच्या सारखा माणूस जो माझ्यासोबत काम करत होता. आम्ही दारूविरोधात आंदोलन केलं होतं, आणि आज त्यांनीच दारू धोरण बनवलं, याचं मला दु:ख वाटलं. पण काहीच करू शकत नाही, सत्तेपुढे कोणाचं काही चालत नाही. आता त्यांना ईडीने अटक केली आहे. आता जे होईल ते सरकारच्या धोरणानुसार होईल. सरकार त्यांच्याबाबत विचार करेल असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
advertisement
शरद पवार यांची प्रतिक्रिया
दरम्यान अरविंद केजरीवाल यांच्या अटकेवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अरविंद केजरीवाल यांना केलेली अटक चुकीची आहे, एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अटक करणं योग्य नाही. केजरीवाल यांच्या अटकेचा मी तीव्र निषेध करतो. जनतेनं सामूहिक शक्ति दाखवून द्यावी. आणीबाणीत जे झालं नव्हतं ते आता होत आहे. धोरण ठरवलं म्हणून अटक करणं चुकीचं. आम्ही केजरीवाल यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, निवडणुकीच्या पारदर्शकतेबद्दल चिंता वाटते. असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.
