2019 मध्ये त्यांनी काँग्रेसकडून शिर्डी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पराभवानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी श्रीरामपूर विधानसभेची निवडणूक लढवली. आता भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात यावेळी भाऊसाहेब कांबळे यांच्याविरोधात भाऊसाहेब वाकचौरे अशी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे या मतदारसंघावर रामदास आठवले यांनी देखील दावा केला आहे. त्यामुळे आता हा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
advertisement
भाऊसाहेब कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या मतदारसंघावर भाजपनं दावा केला आहे, दुसरीकडे रामदास आठवले यांनी देखील दावा केला आहे. या मतदारसंघात सध्या शिवसेनेचा खासदार आहे, त्यामुळे ही जागा मिळवण्यासाठी शिवसेना देखील आग्रही आहे. सदाशिव लोखंडे हे सध्या शिर्डीचे खासदार आहेत, मात्र त्यांच्याऐवजी भाऊसाहेब कांबळे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे आता शिर्डीमधून कोणाला उमेदवारी मिळणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
