अहमदनगर शहरातील जमीर शेख आणि त्यांची पत्नी यांना दोघांनाही पूर्वीपासूनच सनातन धर्माची आवड होती. त्यांना सात मुले आहेत त्यापैकी पाच मुलींचे पूर्वीच हिंदू समाजातील मुलांसोबत लग्न झाले आहे. दोन मुलं लहान आहेत. त्यांच्या कुटुंबाला पूर्वीपासूनच हिंदू धर्माची आवड होती. त्यांची ही तिसरी पिढी आहे ,त्यामुळे त्यांनी रीतसर हिंदू धर्मात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जमीर शेख यांनी बजरंग दलाचे शहर अध्यक्ष कुणाल भंडारी यांच्या माध्यमातून बागेश्वर बाबा यांच्या उपस्थितीत संभाजीनगर येथे हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. जमीर निजाम शेख यांनी हिंदू धर्मात प्रवेश केल्यानंतर आता त्यांचं नामकरण शिवराम आर्य करण्यात आलं आहे.
advertisement
'शिवराम आर्यांनी त्यांच्या कुटुंबासह सनातन धर्मामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती, त्यांनी बागेश्वर बाबा यांच्या उपस्थितीत हिंदू धर्मात प्रवेश करण्याचा आग्रह धरला. त्यानंतर त्यांची परवानगी घेऊन आम्ही त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे घेऊन गेलो. त्यांनी मुस्लीम धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश केला अशी माहिती कुणाल भंडारी यांनी दिली आहे'.
