मात्र दुसरीकडे जरांगे पाटील यांच्या या मागणीला ओबीसी संघटनांचा विरोध आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी समजाकडून अहमदनगरमध्ये रास्ता रोको करण्यात आला आहे. हे आंदोलन चिघळलं असून, टायर पेटवून सरकारचा निषेध करण्यात आला आहे.
मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या, ओबीसीतून आरक्षण नको या मागणीसाठी कीर्तनवाडी येथे प्रल्हाद कीर्तने यांचं उपोषण सुरू आहे, या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज ओबीसी समाजाच्या वतीने भगवान गडाच्या पायथ्याशी विशाखापट्टनम महामार्गावर रास्ता रोको करण्यात आला. या रास्ता रोकोला मोठ्या प्रमाणावर ओबीसी समाजातील नेते आणि कार्यकर्ते उपस्थित आहेत. जवळपास दोन तासांपासून हा रास्ता रोको सुरू आहे. मात्र दोन तासांपासून आदोलन सुरू असूनही शासनाचा कुणीही प्रतिनिधी या ठिकाणी आला नसल्यानं कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी शासनाचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर टायर पेटवून सरकारचा निषेध केला.
advertisement
