घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नितीन खुळे या तरुणाचं लग्न ठरलं होतं. मात्र ते काही कारणांमुळे मोडलं. लग्न मोडल्यामुळे निराश झालेल्या नितीन यानं तालुक्यातील वडगावपान शिवारात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दरम्यान दुसरीकडे गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीच्या दहशतीमुळे नितीन याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे.
दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणानं एक व्हिडीओ देखील रेकॉर्ड केला होता. त्यामध्ये त्याने आपली व्यथा मांडली होती. तसेच पोलिसांना त्याच्याजवळ जी सुसाईड नोट आढळून आली आहे, त्या सुसाईड नोटमध्ये त्याने ज्यांच्याकडून त्याला त्रास होत होता त्यांची नावं लिहून ठेवली आहेत. या प्रकरणात प्राप्त फिर्यादीवरून पोलिसांनी प्रदीप भाऊसाहेब शिंदे, संदीप उर्फ संतोष शिवाजी दिघे, पोपट उर्फ बाजीराव सावळेराम कोल्हे, नानासाहेब कोल्हे (सर्व रा. कोल्हेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुद्ध कलम 306, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
advertisement