घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील रहिवासी असलेला नागेश चव्हाण हा तरुण गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता होता. बेपत्ता असलेल्या नागेशचा शोध सुरू असताना धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नागेशचा त्याच्या मित्रानेच खून केल्याचं समोर आलं आहे. अर्जुन पिंपळे असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. या प्रकारानं खळबळ उडाली आहे.
advertisement
जानेवारी महिन्यात आरोपी अर्जुन पिंपळे यानेच आपला मित्र नागेशची गळा दाबून हत्या केली आणी त्याच्या प्रेयसीवर अत्याचार केल्याचं स्पष्ट झालं आहे. या गुन्ह्यामध्ये अर्जुन पिंपळे याच्यासह आणखी दोन आरोपींचा सहभाग आहे. आरोपींमध्ये एक महिला देखील आहे. हत्या झाल्यानंतर इतर आरोपींनी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी बेपत्ता असलेल्या तरुणाच्या प्रेयसीला ताब्यात घेल्यानंतर तीने सर्व घटना पोलिसांना सांगितली. या प्रकरणात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुख्य आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
