याबाबत मिळालेली माहिती अशी की, वडगाव लांडगा इथल्या सुनील लांडगे याने त्याची वर्षीय पत्नी लिलाबाई, मुलगी साक्षी आणि खुशी यांना घरात जिवंत जाळले. नगर तालुक्यातील वडगाव लांडगा येथील लिलाबाई लांडगे आणि त्यांच्या दोन मुली घरात असताना आरोपी सुनील लांडगे यांनी दोघांना अंगावर रॉकेल ओतून जिवंत जाळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.
advertisement
आरोपी सुनिल लांडगे तिघींना जिवंत जाळल्यानंतर दारुच्या नशेत घरासमोर असलेल्या झाडाखाली बसला होता. तसंच मी पत्नीला जाळत असताना पत्नी माझ्या पाया पडत होती असंही बडबडत होता. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल असून पंचनामा करत आहेत.
पिंपळगाव लांडगा येथे सुनील लांडगे या तरुणाने दारूच्या नशेत असतानी सोमवारी सकाळी नऊ वाजता पत्नी आणि दोन मुलींना जिवंत जाळले. पत्नी लिलाबाई (वय 26 वर्ष), मुलगी साक्षी (वय 14 वर्षे) व खुशी नऊ महिने यांना मुलींना जिवंत जाळल्याच्या घटनेत पत्र्याची खोलीसुद्धा जळून खाक झाली. पोलिसांनी तिघींचे मृतदेह बाहेर काढले आहेत.
