TRENDING:

'अयोध्येत गोळीबार करणार', पोलिसांना धमकीचा फोन, संगमनेरमधून एक जण ताब्यात

Last Updated:

अहमदनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर, हरीष दिमोटे, प्रतिनिधी : अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्लांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील लाखो भाविक अयोध्येला जाणार आहेत. अनेक जण तर अयोध्येमध्ये दाखल झाले आहेत. मात्र यातच 112 नंबरच्या क्रमांकावरून संगमनेर पोलिसांना एक धमकीचा कॉल आला. अयोध्येमध्ये गोळीबार करणार अशी धमकी समोरच्या व्यक्तीनं पोलिसांना दिली. या धमकीमुळे खळबळ उडाली.
प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
advertisement

धमकी मिळताच पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. या प्रकरणात संगमनेर पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. योगेश परदेशी असं या व्यक्तीचं नाव आहे.योगेश परदेशी हा संगमेर शहरातच राहातो. त्याने दारूच्या नशेत पोलिसांना धमकीचा कॉल केल्याची माहिती समोर आली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

योगेशने दारूच्या नशेत पोलिसांना गोळीबार करण्याची धमकी देणारा फोन केला होता. अशी माहिती तपासातून समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी त्याच्याविरोधात मुंबई दारूबंदी कायद्याचे कलम ८५ (१) तसेच इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.  घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
'अयोध्येत गोळीबार करणार', पोलिसांना धमकीचा फोन, संगमनेरमधून एक जण ताब्यात
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल