दोन वर्षापूर्वी प्राजक्त तनपूरे यांचा मुलगा सोहेल हा ज्या स्कुलमध्ये शिकत होता त्याच स्कुलमध्ये पुण्यातील घटनेतील हे आरोपी तरूणांचा ग्रुप शिकत होता. मात्र शिक्षणापेक्षा हा ग्रुप इतरांना खुप त्रास देत होता. वर्ण, जाती , दिसण्यावरून टोमणे मारणं अशा प्रकारच्या त्रासाला कंटाळून तनपूरेंनी आपल्या मुलाला स्कुलमधून काढले होते. सध्या तनपुरेंचा मुलगा अमेरिकेत शिक्षणासाठी आहे. आरोपी तरुण ज्यांच्यासोबत असायचा त्याच्या मित्रांच्या ग्रुपने आपल्या मुलाला त्रास दिला गेला होता असं सोनाली तनपुरे यांनी म्हटलं.
advertisement
एक आई म्हणून केलेलं ट्विट असल्याचं सोनाली तनपुरे म्हणाल्या आहेत. याचा कुठलाही राजकीय संबध नाही. अपघातात दोन जणांचा जिव गेला त्यामुळे भावनिक झालेल्या आईने केलेलं ते ट्विट आहे. बेदरकारपणे गाडी चालवणं, रात्री उशिरापर्यंत मुलांच पबमध्ये दारू पिणं, इतरांना त्रास देत असूनही पाठीशी घालणं यास स्कुल प्रशासन नाही तर पालक जबाबदार असल्याचं त्यांच म्हणणं आहे.. मुलांना चांगले संस्कार दिले जावे हि त्यांची अपेक्षा आहे. पुण्यात कुठेतरी पब संस्कृती फोफावतेय याचंही त्यांना वाईट वाटतंय असंही त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं.
सोनाली तनपुरे यांनी म्हटलं की, संबंधित घटनेतील मुलगा हा माझ्या मुलासोबत एकाच वर्गात शिकत होता. त्यावेळी त्यापैकी काही मुलांकडून माझ्या मुलाला खूप त्रास झाला होता. या मुलांची तक्रार मी त्यांच्या पालकांकडे केली होती. मात्र योग्य प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी या मुलांच्या त्रासाला कंटाळून त्याची शाळा बदलावी लागली. त्या घटनांचा वाईट परिणाम आजही त्याच्या मनावर आहे.
वाईट प्रवृत्ती असणाऱ्या मुलांची दखल वेळीच घेतली असती तर असा भयंकर गुन्हा कदाचित घडला नसता. त्यादिवशी झालेल्या अपघातात सुशिक्षित तरुण तरुणीचा बळी गेला. त्यांची कुटुंबं उद्धवस्त झाली. या कुटुंबांना न्याय मिळायला हवा, असे सोनाली तनपुरे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
