ही घटना अकोले तालुक्यातील बेलापूर गावात घडली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून दिरानेच आपल्या दोन भावजयांची कोयत्यानं वार करून हत्या केली आहे. आरोपी दीर गावातून हातात कोयता घेऊन फिरताना सिसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेने अकोले तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
अकोले तालुक्यातील बेलापूर बदगी गावात सोमवारी भर दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. आरोपी दत्तात्रय प्रकाश फापाळे याने किरकोळ पैशाच्या वादातून उज्वला अशोक फापाळे आणि वैशाली संदीप फापाळे यांची कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली आहे. घटनेची माहिती मिळताच अकोले पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना या दोघीही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. आरोपी घटनस्थळावरून फरार झाला असून, आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
advertisement
Location :
Ahmadnagar (Ahmednagar),Ahmadnagar,Maharashtra
First Published :
October 08, 2024 9:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
माथेफिरू दिरानं आपल्याच दोन भावजयांना संपवलं, हातात कोयता घेऊन गावभर फिरला, अहमदनगर हादरलं
