गुंडाराज कुणाचे हे सर्व जनतेला माहिती : निलेश लंके
विखे पाटील यांच्या टीकेवर बोलताना निलेश लंके म्हणाले, की गुंडाराज कुणाचे हे सर्व जनतेला माहिती आहे. राहात्यात (विखेंचा मतदारसंघ) जाऊन पहा गुंडाराज काय असतो. कार्यकर्त्यांनी व्हॉटस्अप स्टेटस ठेवला तरी मारहाण केली जाते. माझ्यावर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा एक गुन्हा दाखल आहे. त्यामुळे गुंडाराज यांचाच असून पोलीस प्रशासनाचा देखील वापर केला जात असल्याचा आरोप निलेश लंके यांनी केला. त्यामुळे जनता यांनाच दाखवून देईल, असा पलटवार लंके यांनी केला.
advertisement
मोदींची सभा होतेय इथेच माझा विजय : लंके
माझ्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होतीये इथेच माझा विजय झाला आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्यासाठी देशाचे प्रधानमंत्री आणि अनेक नेते येत आहेत. त्यामुळे माझा गुलाल फिक्स आहे. आपण पंतप्रधानांना टिव्हीवरच बघत होतो. आता ते माझ्या विरोधात येतायेत. आपली किती ताकद वाढलीय, असा मिश्किल टोला निलेश लंके यांनी लगावला.
विखेंना गुंडांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही : प्राजक्त तनपुरे
विखे पाटलांना गुंडांविषयी बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांच्या आजूबाजूला, कडेवर गुंडच असतात. राहुरी मतदारसंघाच्या माजी आमदारावर इतके गुन्हे आहेत की ते तडीपार व्हायला पाहिजे. नगर शहरातले नावाजलेले गुंड यांच्याच मंचावर असतात. दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना आपल्याकडे चार बोटं असतात याचे आत्मपरिक्षण करा. नगर शहरात गुंड सर्वसामान्य लोकांच्या जमिनीचे ताबे घेतायेत. तुमच्या राज्यात काय चाललंय ते बघा. तुमचं राज्य थोड्याच दिवसाचं आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केली.
