या शाळेतील शिक्षिका सविता कार्ले यांची श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथे बदली झाली. त्या आज एक ऑगस्ट रोजी त्यांच्या बदलीच्या ठिकाणी रुजू देखील झाल्या. मात्र आपल्या आवडत्या शिक्षेकेच्या बदलीची बातमी कळताच विद्यार्थ्यांना आश्रू अनावर झाले. मॅडमची बदली रद्द करा, मॅडमची बदली झाली तर आम्ही शाळेत जाणार नाही अशी भूमिका या विद्यार्थ्यांनी घेतली.
advertisement
विद्यार्थी प्रिय मॅडम अशी कार्ले यांची ओळख आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांच्या आवडत्या शिक्षिका होत्या. अध्यापना बरोबरच शाळेतील सर्वच उपक्रमात त्यांचा पुढाकार असायचा. विद्यार्थ्यांना त्या कायम प्रोत्साहित करत असत. ग्रामस्थांनाही त्यांच्या शिकवण्याची पद्धत माहिती असल्यामुळे अखेर ग्रामस्थही विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. ग्रामस्थांनी शाळेच्या गेटला टाळे ठोकत जोपर्यंत बदली रद्द होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी शाळेत जाणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे. शाळेच्या प्रवेशद्वारावरच ग्रामस्थांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे.
