नगरमध्ये मोर्चा काढून निषेध
मुस्लिम समाजाचे धर्मगुरू मोहम्मद पैगंबर यांच्या विरोधात वक्तव्य केल्यामुळे मुस्लिम समाजाने आक्रमक भूमिका घेतली होती. याचा निषेध करण्यासाठी आज अहमदनगरमध्ये कुठला स्टॅन्ड ते डीएसपी चौक असा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे रूपांतर नंतर रस्ता रोकोमध्ये करण्यात आले. यावेळी महंत रामगिरी महाराज यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी मुस्लिम बांधवांनी केली आहे.
advertisement
वाचा - विधानसभेच्या तोंडावर भाजप मुंबईत भाकरी फिरवणार! कोणाचा पत्ता होणार कट?
काय आहे प्रकरण?
सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पंचाळे गावामध्ये प्रवचनाच्या दरम्यान मुस्लिम धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्याचे व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत. या व्हिडिओमुळे छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूरमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता.
