TRENDING:

...म्हणून रोहित पवार शिबिराला आले नाहीत; जयंत पाटलांनी केला खुलासा

Last Updated:

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन दिवसीय शिबीर शिर्डीत सुरू झाले आहे. मात्र या शिबिराला रोहित पवार गैरहजर आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अहमदनगर, प्रतिनिधी : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दोन दिवशीय शिबीर शिर्डीत सुरू झाले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकवून शिबिराला आज  सुरूवात झाली आहे. आज आणि उद्या दिवसभर पक्षाचे ध्येयधोरणं आणि निवडणुकांच्या दृष्टीने वाटचाल कशी असावी याबाबत या शिबिरामध्ये विचारमंथन केलं जाणार आहे. या शिबिराला  जयंत पाटील, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते आणी पदाधिकारी  उपस्थित आहेत. मात्र दुसरीकडे रोहित पवार हे मात्र या शिबिराला अनुपस्थित आहेत.
News18
News18
advertisement

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावर प्रतिक्रिया देताना रोहित पवार यांच्या अनुपस्थितीबाबत खुलासा केला आहे. रोहित पवार परदेशात असल्यामुळे ते या शिबिराला येऊ शकले नाहीत, आज संध्याकाळपर्यंत ते शिबिराला पोहोचतील असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krushi Market: मक्याचे दर भुईसपाट! कांदा, सोयाबिनला रविवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

दरम्यान आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचं शिर्डीमध्ये हे शिबीर होत असल्यानं याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या हस्ते पक्षाचा ध्वज फडकवून शिबिराला आज  सुरूवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचं देखील एक शिबीर झालं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/अहमदनगर/
...म्हणून रोहित पवार शिबिराला आले नाहीत; जयंत पाटलांनी केला खुलासा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल