याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदरची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुनारास समनापूर शिवारातील हॉटेल नेचरजवळ घडली. शनिवारी सकाळी आठ वाजता समनापूरचे पोलीस पोटील गणेश शेरमाळे यांनी याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर उपअधीक्षक सोमनाथ घावचौरे यांनी दोन पथक तयार करुन आरोपींचा शोध सुरू केला.
वाचा - . संभाजीनगरमध्ये पुन्हा खून; हॉटेल कर्मचाऱ्यांच्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू
advertisement
घटनास्थळी बिअरच्या तीन बाटल्या, काडेपेटी, चप्पल, चाकू आणि झटापट झाल्याच्या खुणा आढळून आल्या. बिअरच्या बाटल्या कुठून खरेदी केल्या याचा तपास लागल्यानंतर अवघ्या तासाभरात आरोपींची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी तात्रिक तपास करुन दोन संशयितांना ताब्यात घेतलं. त्यांच्या कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबूली दिली. हा खून अनैतिक संबंधातून झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, संशयित आरोपींवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे.
