भरधाव स्कूल बसने सायकलला धडक दिल्याची घटना समोर आलीय. झालेल्या अपघातात सायकलवर असणाऱ्या शालेय विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तिचा भाऊ जखमी झाला आहे. सदरची घटना कोपरगाव तालुक्यातील पढेगाव परीसरात सोमवारी घडली. अपघाताच जखमी झालेल्या मुलाचं नाव ऋतिक पगारे असून मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचं नाव कोमल पगारे आहे.
वृद्ध दाम्पत्याने बनवलं जगातील सर्वात मोठे कुलूप, अयोध्येतील राम मंदिराला अर्पण करण्याची इच्छा
advertisement
कोमल आणि ऋतिक पगारे हे दोघे बहिण भाऊ सायकल वरून शाळेत जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या श्री गुरुदत्त इंग्लिश मीडियम स्कूलच्या बसने जोराची धडक दिली. या अपघातात 14 वर्षीय विद्यार्थिनी कोमल नारायण पगारे हिला जबर दुखापत झाली. तिला ग्रामस्थांनी उपचारासाठी कोपरगाव येथे नेत असताना उपचारापूर्वीच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर दहा वर्षीय ऋतिक नारायण पगारे हा जखमी झालाय.
VIDEO : इमारतीवर चढून व्यक्ती करत होती स्टंट, 68व्या मजल्यावरून पाय घसरला आणि....
दरम्यान, कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात बस चालका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या दुर्दैवी घटनेने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. अशा अपघातांचे प्रमाण अधिक होत चालले असून अनेकांना आपला जीव गमवावा लागतो.
