VIDEO : इमारतीवर चढून व्यक्ती करत होती स्टंट, 68व्या मजल्यावरून पाय घसरला आणि....
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जगभरात अनेक धाडसी लोक आहेत. जे कोणताही स्टंट, धाडसी गोष्ट करायला घाबरत नाही. सोशल मीडियावर असे धाडसी लोकांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात.
नवी दिल्ली, 31 जुलै: जगभरात अनेक धाडसी लोक आहेत. जे कोणताही स्टंट, धाडसी गोष्ट करायला घाबरत नाही. सोशल मीडियावर असे धाडसी लोकांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. सोशल मीडियावर लोक प्रसिद्धीसाठी अशी स्टंटबाजी करतात. बऱ्याचदा हे स्टंट लोकांना महागात पडतात. असाच आणखी एक प्रकार समोर आलाय. ज्यामध्ये व्यक्ती 68 व्या मजल्यावर चढून स्टंट करत होता. मात्र पुढे नको ते घडलं. ही घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
व्यक्तीचा हृदयाचा ठोका चुकवणारा स्टंट व्हिडीओ सध्या इंटरनेटवर जोरदार व्हायरल होतोय. 30 वर्षीय व्यक्तीनं इमारतीच्या 68 व्या मजल्यावर चढून स्टंट केला. मात्र पुढे त्याच्यासोबत भयानक घडलं.
ही घटना हाँगकाँगमध्ये फ्रेंच डेअरडेव्हिल रेमी लुसिडीसोबत घडली. 30 वर्षीय लुसिडी हा स्टंट करत होता, त्यादरम्यान ट्रेगंटर टॉवर कॉम्प्लेक्सच्या पेंट हाऊसच्या बाहेर अडकला. घाबरून त्यानं खिडकीवर हात-पाय मारायला सुरुवात केली, ज्यामुळे आतील मोलकरीण घाबरली. त्यानंतर त्याचा इमारती
advertisement
हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लुसीडी रविवारी संध्याकाळी 6 वाजता इमारतीत घुसले होते. 40 व्या मजल्यावर मित्राला भेटायला आल्याचं त्यानं सुरक्षा रक्षकाला सांगितलं. त्यानंतर लुसीडीनं लिफ्टमधून जाऊन स्टंटही सुरु केला होता. विचारपूस केल्यावर गार्ड त्याला ओळखत नसल्याचं उघड झालं. इमारतीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये तो स्टंटबाजी करताना दिसला.
advertisement
दरम्यान, लुसीडीला शेवटचा संध्याकाळी 7.30 वाजता पेंटहाऊसच्या खिडकीवर हात मारताना दिसला होता. त्यानंतर मोलकरणीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांना तेथून लुसीडीचा कॅमेरा सापडला आहे. त्यात डेअरडेव्हिलच्या स्काय स्क्रॅपर्सवर शूट केलेले धोकादायक व्हिडिओ होते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 31, 2023 5:41 PM IST
मराठी बातम्या/Viral/
VIDEO : इमारतीवर चढून व्यक्ती करत होती स्टंट, 68व्या मजल्यावरून पाय घसरला आणि....


