वृद्ध दाम्पत्याने बनवलं जगातील सर्वात मोठे कुलूप, अयोध्येतील राम मंदिराला अर्पण करण्याची इच्छा
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
वृद्ध दाम्पत्याला हे कुलूप बनवण्यासाठी दीड लाख रुपये खर्चासोबत 6 महिन्याचा कालावधी लागला.
वसीम अहमद, प्रतिनिधी
अलीगढ, 1 जुलै : कुलूपांसाठी अलीगढ हे फक्त देशातच नाही तर जगात प्रसिद्ध आहे. ही ओळख काय ठेवण्यासाठी एक दाम्पत्य वर्षानुवर्षे मेहनत घेत आहे. त्यांनी सुरुवातीच्या ऑर्डरवर 300 किलोचे मोठे कुलूप बनवले होते. यानंतर आता त्यापेक्षाही मोठे 30 किलोच्या चाबीसह त्यांनी 400 किलोचे कुलूप बनवले आहे. याला जगातील सर्वात मोठे कुलूही म्हटले जाऊ शकते.
advertisement
वृद्ध दाम्पत्याला हे कुलूप बनवण्यासाठी दीड लाख रुपये खर्चासोबत 6 महिन्याचा कालावधी लागला. या दाम्पत्याला हे कुलूप अयोध्येत तयार होत असलेल्या भव्य राम मंदिराला अर्पण करण्याची इच्छा आहे. सत्य प्रकाश शर्मा आणि रुख्मिणी शर्मा असे या दाम्पत्याचे नाव आहे. कारागीर सत्य प्रकाश शर्मा यांच्या पत्नी रुख्मिणी देवी यांनी सांगितले की, आमची इच्छा होती की आम्ही राम मंदिरासाठी कुलूप बनवावे. यासाठी त्यांनी 400 किलोचे कुलूप बनवले.
advertisement
त्या म्हणाल्या की, त्यांचे पती हृदयरोगाचे रुग्ण आहे. या कारणामुळे हे कुलूप बनवायला वेळ लागला. आम्हाला हे कुलूप राम मंदिराला भेट द्यायचे आहे. लोक हे कुलूप पाहून आमच्यासोबत फोटो आणि व्हिडिओही काढत असून आम्हाला आशीर्वादही देत आहेत, असे त्या म्हणाल्या.
400 किलोचे कुलूप, 10 फूट लांब -
याबाबतची माहिती देताना हे कुलूप बनविणारे सत्य प्रकाश शर्मा म्हणाले की, आम्ही पती-पत्नीने मिळून हे कुलूप तयार केले आहे. आमच्या दोघांची इच्छा आहे की, अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिराला हे कुलूप अर्पण करावे. आता जोपर्यंत आमची आर्थिक क्षमता होती, तोपर्यंत आम्ही तो खर्च केला. मात्र, यानंतर यापेक्षा अधिक आमची आर्थिक क्षमता नाही. यामुळेच आम्ही त्याला अयोध्येतील राम मंदिरापर्यंत नाही पोहोचवू शकलो.
advertisement
हे 4 क्विंटलचे म्हणजेच 400 किलोचे कुलूप आहे. यासाठी दीड लाख रुपये खर्च आला आहे. या कुलुपाची लांबी 10 फूट तर रुंदी 4.5 फूट आहे. तसेच या कुलुपाची जाडी ही 9.5 इंच आहे. हे कुलूप बनवायला आम्हाला 6 महिने लागले. प्रभू श्रीरामचंद्र यांना हे कुलूप भेट देण्यासाठी मी आणि माझ्या पत्नीने हे कुलूप बनविले आहे, असे ते म्हणाले.
view commentsLocation :
Uttar Pradesh
First Published :
August 01, 2023 4:25 PM IST
मराठी बातम्या/Viral/
वृद्ध दाम्पत्याने बनवलं जगातील सर्वात मोठे कुलूप, अयोध्येतील राम मंदिराला अर्पण करण्याची इच्छा


