पुणतांबा इथल्या कृषी तंत्र विद्यालयातील ही घटना आहे. डीजेच्या आवाजामुळे एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं आहे. 20 वर्षांचा हा मुलगा सुयोग अडसुरे असं त्याचं नाव आहे. तो राहुरी तालुक्यातील वरवंडी इथं राहणारा होता. कृषी विद्यालयाच्या पदविका अभ्यासक्रमातील द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. विद्यालयाच्या वसतिगृहात तो राहत होता.
24 वर्षांचा पोलीस शिपाई व्यायाम करताना कोसळला, झाला मृत्यू, धक्कादायक कारण समोर
advertisement
विद्यालयाची शुक्रवारपासून परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी निरोप समारंभ आयोजित केला होता. दुपारी विद्यार्थ्यांचं नाचगाणं सुरू होतं. त्यावेळी सुयोगला छातीत त्रास जाणवू लागला. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं पण उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित करण्यात आलं.
महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी मात्र डीजेचा आवाज नियंत्रणात होता, मृत्यूचं कारण वेगळं असू शकतं, असा दावा केला आहे. शेवटचं वर्ष असल्याने विद्यार्थ्यांनी डीजे लावण्याची मागणी केल, त्यांनी खूप आग्रह केला. पण आवाज नियंत्रणता होता. घडलेली घटना दुर्देवी आहे पण मृत्यूचं कारण डीजेशी संबंधित नाही, असं महाविद्यालयाचे प्राचार्य अविनाश गायकवाड यांनी 'लोकमत'शी बोलताना सांगितलं.
हृदयविकाराच्या झटक्याने गेला तरुणाचा जीव; 50 मिनिटांनंतर जे घडलं ते पाहून डॉक्टरही चक्रावले
दरम्यान डीजेच्या आवाजाने मृत्यू झाल्याची काही प्रकरणं याआधीही समोर आली आहे. डॉक्टर सांगतात, की माणसांचे कान 70 डेसिबल मर्यादेपर्यंत आवाज सहन करू शकतात. 100 ते 120 डेसिबल दरम्यानच्या आवाजामुळे माणसाच्या कानाचा पडदा फाटू शकतो. यामुळे चक्कर येऊ शकते. तसंच या आवाजामुळे कानाची हृदयाला जोडलेली नस स्टिम्युलेट होते. त्यामुळे हृदयाचे ठोके बंद पडू शकतात आणि हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
