हृदयविकाराच्या झटक्याने गेला तरुणाचा जीव; 50 मिनिटांनंतर जे घडलं ते पाहून डॉक्टरही चक्रावले
- Published by:Kiran Pharate
Last Updated:
एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. काही मिनिटांतच त्याच्या हृदयाची धडधड थांबली. श्वास थांबला. घरात शोककळा पसरली होती
नवी दिल्ली : एकदा जीव गेलेली माणसं जिवंत होत नसतात, हे आपल्याला माहिती आहे. पण अशा अनेक घटना समोर येतात ज्यामुळे या दाव्यावर प्रश्न निर्माण होतात. अशाच एका घटनेत एका व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला होता. काही मिनिटांतच त्याच्या हृदयाची धडधड थांबली. श्वास थांबला. घरात शोककळा पसरली होती, पण 50 मिनिटांनी ही व्यक्ती पुन्हा जिवंत झाली. ते पाहून घरच्यांना आश्चर्य वाटलं. त्यांनी लगेचच व्यक्तीला रुग्णालयात नेलं. तिथल्या डॉक्टरांनी त्याची प्रकृती पाहिली तेव्हा तेही चक्रावून गेले.
मेट्रोच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनचे रहिवासी असलेले 31 वर्षीय बेन विल्सन आपल्या घरात बसला असताना अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं. काही समजण्याआधीच तो कोसळला. आवाज ऐकून त्याची होणारी बायको रेबेका होम्सने त्याला लगेच सीपीआर दिला. रुग्णवाहिकेला माहिती देण्यात आली. दरम्यान, बेनच्या हृदयाची धडधड थांबली. हे पाहून रेबेका अस्वस्थ झाली. मात्र 50 मिनिटांनी त्याचा श्वासोच्छवास पुन्हा सुरू झाला. त्याच्या हृदयाचे ठोके पुन्हा सुरू झाले. हे पाहून रेबेकाने त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं.
advertisement
जेव्हा डॉक्टरांनी त्याला पाहिलं तेव्हा त्यांनी त्याला ताबडतोब कोमा विभागात ठेवलं, जेणेकरून त्याला आणखी त्रास होण्यापासून वाचवता येईल. त्याच्या हृदयात रक्ताची गुठळी तयार झाली होती, त्यामुळे हृदयाने काम करणं बंद केलं होतं. त्याच्या किडनीने काम करणं बंद केलं होतं. त्यामुळे त्याच्या फुफ्फुसातही समस्या निर्माण झाल्या. नंतर त्याच्यावर शस्त्रक्रिया करून स्टेंट टाकण्यात आला. डॉक्टरांनी रेबेकाला सांगितलं की ऑपरेशन यशस्वी झालं आहे, परंतु तो कोमातच राहील. त्याच्या मेंदूला 2 दिवस सूज आली होती. रुग्णालयात सातव्या दिवशी बेनला अनेक हृदयविकाराचे झटके आले, पण तो वाचला.
advertisement
रेबेका म्हणाली, 'मी पूर्ण वेळ त्याच्यासोबत राहिले. त्याला सांगत राहिले, की माझं त्याच्यावर प्रेम आहे. मी ड्रीम अ लिटल ड्रीम ऑफ हे गाणं त्याच्यासाठी गायले. मी त्याच्या उशीवर माझं परफ्यूम स्प्रे केलं आणि त्याच्या शेजारी मी त्याच्यासाठी विकत घेतलेला एक टेडी ठेवला, ज्यावर लव्ह यू टू द मून अँड बॅक असं लिहिलं होतं. माझा विश्वास आहे की त्याच्यावरील माझं प्रेम त्याला जिवंत ठेवतं. तो वाचला हा एक चमत्कार आहे. डॉक्टरांनी त्याला गेमिंग, स्मोकिंग, खराब आहार आणि चेरी कोलाचे कॅन पिण्यापासून रोखलं आहे. मी त्याला हे सर्व कधीच करू देणार नाही.'
advertisement
रूग्णालयाच्या वैद्यकीय संचालक डॉ. जेनिफर हिल यांनी सांगितलं की, त्याची प्रकृती चांगली होत आहे, हे जाणून आम्हाला आनंद होत आहे. त्या परिस्थितीतून तो बाहेर आला हा चमत्कारच आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 29, 2024 7:50 AM IST
मराठी बातम्या/Viral/
हृदयविकाराच्या झटक्याने गेला तरुणाचा जीव; 50 मिनिटांनंतर जे घडलं ते पाहून डॉक्टरही चक्रावले







