नेमकं काय म्हणाले विखे?
रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा शिर्डीमधून लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याबाबत भाजप खासदार सुजय विखे यांनी बोलताना म्हटलं की, जो कोणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावेल त्याचा प्रचार आम्ही करू. आम्हाला कोणाचीही अडचण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी जो आदेश देतील तोच खासदार होईल असं विखे यांनी म्हटलं आहे.
advertisement
रामदास आठवले यांनी अनेकदा शिर्डी मतदारसंघामधून उभं राहण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ते यापूर्वी देखील एकदा शिर्डी मतदारसंघातून उभे राहिले होते. मात्र त्यावेळी त्यांना मोठ्या फरकानं पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र सध्या राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडी पहाता यावेळी चित्र वेगळं असणार आहे. या मतदारसंघात अटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भाजप या मतदारसंघातून आपल्या मित्रपक्ष असलेल्या आरपीआयला पाठिंबा देणार का? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
