पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या सापाचे शास्त्रीय नाव हे 'lycodon falvomaculatus' आहे. हा साप बिनविषारी आहे. परंतु, जवळपास आठ ते नऊ वर्षांनंतर हा साप आढळून आला आहे. सापाच्या संपूर्ण काळ्या रंगाच्या शरीरावर पिवळ्या ठिपक्यांचे आडवे पट्टे आहेत. तसेच पोटाकडील भागवर पांढरे ठिपके, डोळे काळे व डोक्याचा रंगही काळा असल्याने डोळे लवकर दिसत नाहीत. ओठांच्या खालचा भाग पांढरा आहे, असे खिरे सांगतात.
advertisement
पावसाळ्यात डासांनी सतावलंय? लगेच करा हा रामबाण उपाय, अन्यथा आरोग्याला धोका!
पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या सापाची लांबी ही सरासरी 1 फूट असते. तर जास्तीत जास्त हा साप दीड फुटाचा असतो. या सापाचे प्रजनन हे अंडज असून ते जून-जुलै दरम्यान मादी 2 ते 4 अंडी घालते. ठिपक्यांचा कवड्या सापाचे खाद्य जंगली पाली, सरडे व काही वेळेस कीटक आहे. पिवळ्या ठिपक्यांचा कवडसा हा जास्त करून शहर व ग्रामीण भागातही आढळतो. तसेच पालीच्या शोधात घराजवळही हा साप आढळू शकतो.
वैशिष्ट्ये काय?
पिवळ्या ठिपक्यांचा कवड्या साप हा निशाचर, शांत व लाजाळू मानला जातो. कवड्या सापाच्या तुलनेत याची संख्या खूपच कमी असल्याने क्वचितच दिसतो. शांत स्वभाव असल्याने क्वचित प्रसंगीच चावतो, असे या सापाचे वर्णन आहे. कवड्या सापाला अनेकवेळा मण्यार सापासोबत गोंधळात आणले जाते, पण तो बिनविषारी असतो. त्यामुळे त्याला ओळखणे महत्त्वाचे आहे. काही ठिकाणी हा साप दुर्मिळ मानला जातो आणि त्यामुळे तो निसर्गप्रेमींसाठी विशेष आकर्षण असतो, असेही सर्पमित्र संदीप खिरे यांनी सांगितले.





