नेमकं काय म्हणाले भुजबळ?
'अनेक वेळा भाजपसोबत जाण्याची तयारी झाली. मग पुन्हा अचानक निर्णय बदलला. शिवसेनेची आणि भाजपची विचारधारा सारखीच मग भाजपासोबत जाण्यास विरोध का? आम्ही जनहितासाठी भाजपसोबत गेलो, सत्तेसाठी गेल्याचा प्रचार चुकीचा. अजितदादा स्वार्थासाठी नाही तर विकासासाठी सत्तेत गेले. जनतेनं आमच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलं आहे. ग्रामपंचायतींच्या निकालावरून ते स्पष्ट दिसत असल्याचं' भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते कर्जत येथे आयोजित अजित पवार गटाच्या शिबीरामध्ये बोलत होते.
advertisement
पुढे बोलताना ते म्हणाले की, 'सध्या पक्ष कोणाचा आहे याची न्यायलयीन लढाई सुरू आहे. पक्ष आमचाच आहे. निकाल आमच्या बाजूने लागले. आम्हाला न्याय मिळेल' असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. आपल्याला जास्तीत जास्त आमदार, खासदार निवडून आनावे लागतील असं आवाहनही यावेळी भुजबळ यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना केलं आहे.
