याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, केडगाव इथल्या पार्थ हाइट्समध्ये गेल्या वर्षी घरफोडी झाली होती. कामानिमित्त घरातले बाहेर गेल्याचं पाहून घराचं कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल केला होता.
पोलीस घरफोडीच्या प्रकरणाचा तपास करत होते. त्यांनी आरोपीचा मागही काढला पण प्रज्वल फोनवरून त्याचं राहण्याचं ठिकाण बदलत होता. पुणे, नाशिक, पालघर, कोल्हापूर अशी ठिकाणे बदलून तो गुंगारा देत होता. त्यानंतर पुन्हा आठ महिन्यांनी जानेवारी २०२४ मध्ये त्यानं केडगावमध्येच आणखी एक चोरी केली. साई गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये एका बंद फ्लॅटचं कुलूप तोडून दागिने आणि रोकड चोरली.
advertisement
प्रज्वलने केडगावमध्ये दोन घरफोड्यांमध्ये लाखोंचे दागिने आणि रोकड लंपास केली होती. यातील ३ लाख ९८ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल आणि दुचाकी असे मिळून ५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. केडगावच्या दोन्ही चोऱ्यांमध्ये पोलिसांना साम्य आढळून आले होते. यावरून पोलिसांना प्रज्वलवर संशय आला होता.
शेअर मार्केटमध्ये प्रज्वल पैसे गुंतवायचा. यात त्याला मोठं नुकसान सहन करावं लागलं. कर्जबाजारी झालेला प्रज्वल शेवटी घरफोडी करण्याकडे वळला. त्यानेही आपण कर्जबाजारी झाल्यानं घरफोडी करत असल्याचं सांगितलं. पुणे, नाशिक, पालघर आणि कोल्हापूर इथंही त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
