राज्य आपत्कालीन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 8 एअर इंडिया क्रू सदस्य होते आणि उर्वरित पाच जण प्रवासी होते. हे प्रवासी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील असल्याचे समजते.ओळख पटवण्यासाठी सर्व मृतांची DNA सॅम्पल्स अहमदाबाद येथे पाठवण्यात आली आहेत. त्यांचे अंतिम अहवाल 72 तासांत मिळण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
advertisement
या दुर्घटनेनंतर तब्बल 16 तासांनंतर शुक्रवारी दुपारी ब्लॅक बॉक्स शोधण्यात यश आलं आहे. या ब्लॅक बॉक्समधून अपघाताचं नेमकं कारण समजेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व सहाय्यता करण्याचे निर्देश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना टाटा ग्रूपकडून मदत केली जाणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली आहे.
Air India Plane Crash : No Power...No thrust, कॅप्टनचा शेवटचा भीतीदायक मेसेज, काय सांगितलं?
महाराष्ट्रातील मृतांची नावे
क्रू मेंबर्स
सुमित सभरवाल - मुंबई
अपर्णा महाडिक- मुंबई
मैथिली पाटील - रायगड
रोशनी सोनघरे- डोंबिवली
दीपक पाठक- बदलापूर
इरफान शेख- पिंपरी चिंचवड
क्लाइव कुंदर- मुंबई
श्रद्धा धवन - मुंबई
प्रवासी
महादेव पवार - सोलापूर
आशा पवार - सोलापूर
यशा कामदार- नागपूर
रक्षा मोढा- नागपूर
रुद्र मोढा - नागपूर
अमन अली सैय्यद- मालाड NRI
जावेद अली सैय्यद- मालाड NRI
जायन अली सैय्यद- मालाड NRI
मरियम अली सैय्यद- मालाड NRI
विमान उड्डाणापूर्वी पूर्णपणे ठीक स्थितीत होते. त्याच वेळी, विमानाची तपासणी करणारा फ्लाइट इंजिनिअर एअर इंडियाचाच होता. त्यानेच विमानाची संपूर्ण तांत्रिक तपासणी केली. त्यानंतर, फ्लाइट इंजिनिअरने विमानाच्या उड्डाणाच्या योग्य स्थितीत असल्याच्या रिपोर्टवर स्वाक्षरी केली. मग असं असताना विमान नक्की कसं कोसळलं हा अजूनही प्रश्न सतावत आहे. विमान अपघातामागचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. ब्लॅक बॉक्समधून नेमकं काय गूढ उकलणार हे पाहावं लागणार आहे.