TRENDING:

'माझ्या इच्छेसाठी ती क्रू मेंबर झाली...', पिंकीच्या वडिलांचा आक्रोश, अजितदादांसोबत मुलगी गमावली!

Last Updated:

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे. आज सकाळी अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला चार्टर विमानाने निघाले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं आहे. आज सकाळी अजित पवार हे मुंबईवरून बारामतीला चार्टर विमानाने निघाले होते, तेव्हा बारामती विमानतळावर त्यांचं विमान क्रॅश झालं. विमानामध्ये अजित पवारांसोबत चार्टर प्लेनचे पायलट सुमित कपूर, पायलट शांभवी पाठक, चार्टर प्लेन स्टाफ पिंकी माळी आणि अजितदादांचे सुरक्षा रक्षक पोलीस विदीप जाधव होते. विमान अपघातामध्ये या पाचही जणांचा मृत्यू झाला आहे.
'माझ्या इच्छेसाठी ती क्रू मेंबर झाली...', पिंकीच्या वडिलांचा आक्रोश, अजितदादांसोबत मुलगी गमावली!
'माझ्या इच्छेसाठी ती क्रू मेंबर झाली...', पिंकीच्या वडिलांचा आक्रोश, अजितदादांसोबत मुलगी गमावली!
advertisement

विमान अपघातानंतर मुंबईच्या वरळी भागात राहणाऱ्या पिंकी माळी यांच्या घरी एकच आक्रोश पाहायला मिळत आहे. पिंकीसोबत रात्री बोलणं झालं होतं, आई सकाळी बोलू, असं पिंकी म्हणाली होती, अशी हृदयद्रावक प्रतिक्रिया पिंकीच्या आईने दिली आहे.

पिंकीच्या वडिलांना अश्रू अनावर

'पिंकीला मॉडेलिंगमध्ये करिअर करायचं होतं, पण तिने या क्षेत्रात जावं अशी माझी इच्छा होती. आज असं वाटतंय की मी हा हट्ट का केला?' ही प्रतिक्रिया देताना पिंकीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले.

advertisement

29 वर्षांच्या पिंकी माळीला विमान उड्डाण क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव आहे. मागच्याच वर्षी पिंकी व्हीसीआर कंपनीमध्ये कामाला लागली. त्याआधी पिंकी सांताक्रुझ आंतरराष्ट्रीय विमानतळावर काम करत होती. दोन वर्षांपूर्वी पिंकीचं लग्न झालं होतं आणि ती पतीसोबत ठाण्यात राहायची.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
निवडून आलीस, 10 दिवसांपूर्वीच झाली होती अजितदादांची भेट; वर्षा यांना अश्रू अनावर
सर्व पहा

पिंकीचे वडील शिवकुमार हे दिल्ली विमानतळावर कामाला होते, पण त्यांना कामावरून काढण्यात आलं होतं. तेव्हापासूनच शिवकुमार यांची इच्छा होती की पिंकीने विमान उड्डाण क्षेत्रात करिअर करावं. अजित पवारांना बारामतीमध्ये सोडून पिंकी पुढे नांदेडला जाणार होती. तिला मॉडेलिंग क्षेत्रात करिअर करायचं होतं, जयपूरमध्ये ग्रॅज्युएशन करायचं होतं, यासाठी एक लाख रुपये खर्च येणार होता. हा खर्च करण्याची तिची तयारी होती, असं कुटुंबाने सांगितलं आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'माझ्या इच्छेसाठी ती क्रू मेंबर झाली...', पिंकीच्या वडिलांचा आक्रोश, अजितदादांसोबत मुलगी गमावली!
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल