अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी कुणाकडे येणार? हा मोठा प्रश्न होता.याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये वेगाने हालचाली सूरू झाल्या आहेत.त्यानुसार उद्या मुंबईत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे.या बैठकीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची गटनेते पदी निवड होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहे. गटनेतेपदी निवड झाल्यानंतर उप मुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवार यांची सर्वानुमते निवड होण्याची शक्यता आहे.
advertisement
खरं तर या घडामोडींना तेव्हा वेग आला जेव्हा सुनेत्रा पवार यांच्याशी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल यांनी फोनवरून चर्चा केली. या चर्चेनंतर सुनेत्रा पवार यांच्याकडून सकारात्मक उत्तर आल्याची सुत्रांकडून माहिती मिळते आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री पदी सुनेत्रा पवार यांची निवड होणार आहे, हे जवळपास स्पष्ट झाले आहे.फक्त आता औपचारीकता म्हणून मुंबईत शनिवारी बैठक होणार आहे.या बैठकीत सुनेत्रा पवार यांची उप मुख्यमंत्री पदी निवड होणार आहे? हे स्पष्ट होणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान अजित पवार यांच्याकडे अनेक खाती होती. ही खाती नेमकी कुणाकडे जातील? यावर उद्या चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवारांजवळ असलेल्या खात्यांबाबत काय निर्णय होतो? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
