श्रीगोंदा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शेतकरी मेळावा घेण्यात आला होता. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.या दरम्यान भाषण सूरू असतानाचा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी 'दादा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न घ्या ना, असे संभाजी ब्रिगेडच्या एका कार्यकर्त्यांने सांगताच,माझं झाल्यावर बोल ना मी कुठे नाही म्हटलं.दादा तुम्ही निघून जाल, असे म्हणताच दादांनी पुन्हा भाषणाला सुरुवाता केली.
advertisement
यानंतर पुन्हा संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी कांद्याच्या माळा दाखवत शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भूमिका मांडावी, अशी मागणी केली. पवार यांनी मात्र "मी बोलतो... नंतर बोलतो" असे सांगत कार्यकर्त्यांची मागणी फेटाळून लावली. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात कांद्याच्या माळा उंचावत निषेध नोंदवला.
शेतकरी मेळावा होता पण एका शेतकऱ्याला प्रश्न मांडण्याची परवानगी दिली नाही. दूध उत्पादक शेतकरी, भाकड जनावरांचा प्रश्न, कांद्याचा प्रश्न आहे.त्यामुळे हा कसला शेतकरी मेळावा ही सरळ शेतकऱ्यांची फसवणूक आहे. शेतकऱ्यांनी यांच्या फसवणूकीला बळी पडू नये,असे आमचे स्पष्ट म्हणणे आहे. त्यामुळे आम्ही या कार्यक्रमावरती आम्ही शेतकऱ्यांच्या वतीन बहिष्कार टाकतो,असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी म्हटले आहे.