अजितदादांना पोलिसांकडून अखेरची सलामी देण्यात येत असताना ही घटना घडली. पोलिसांकडून सलामी देताना तीन राऊंड हवेत फायर केले जातात. यावेळी समोरच्या रांगेतील पोलिसाकडून पहिला राऊंड फायर केल्यानंतर दुसरा राऊंड फायर करताना पोलिसाच्या बंदुकीतून मिसफायर झालं. सुदैवाने बंदुकीतून सुटलेली ही गोळी कोणाला लागली नाही. पोलिसांनी देखील कबुली देत मिसफायरवर स्पष्टीकरण दिली आहे.
advertisement
मिसफायरवर पोलीस काय म्हणाले?
मिसफायरवर स्पष्टीकरण देत पोलिस म्हणाले, अजित पवारांना अखेरची सलामी देताना मिसफायरिंग झालं होतं.या बुलेट्समध्ये बंदुकीच्या गोळीप्रमाणे इजा होण्याची क्षमता नसते शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करताना सलामीसाठी वापरण्यात येणारे राऊंड डमी असतात सलामीसाठी तीन राउंड फायर केले जातात तेव्हा या गोळ्या वापरल्या जातात.
अमित शाह अन् मुख्यमंत्र्यांपासून हाकेच्या अंतरावर घटना
हा प्रकार घडला तेव्हा समोरच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शरद पवार आणि राज्य मंत्रिमंडळातील दिग्गज नेते उपस्थित होते. अजित पवार यांचे पुत्र पार्थ आणि जय पवार हे पार्थिवाला मुखाग्नी देत असतानाच हा प्रकार घडला. सुदैवाने, बंदुकीतून सुटलेली गोळी कोणालाही लागली नाही. मात्र, अशा अत्यंत संवेदनशील प्रसंगी झालेल्या या चुकीमुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होत, त्यानंतर पोलिसांनी हे स्पष्टीकरण दिले.
बारामतीच्या मातीत अजित पवारांनी अंतिम श्वास घेतला
बारामतीतून राजकारणाला सुरूवात केली त्याच बारामतीच्या मातीत अजित पवारांनी अंतिम श्वास घेतला. लोकनेता सोडून गेल्यामुळे पोरकं झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या घटनेला 24 तास उलटले तरी दादा आपल्यात नाही हे पचवणे कार्यकर्त्यांना जड जात आहे. अबाल-वृद्ध यांच्या सर्वांच्या भावना सारख्याच होत्या. आपण पोरके झालोत, ही उचंबळून आलेली भावना अश्रू आणि हुंदक्यांच्या रूपानं बाहेर पडत होती
