अजित पवारांचा एकनाथ शिंदेंवर अप्रत्यक्ष निशाणा
अजित पवार मंचर येथील भाषणात म्हणाले की, "मंचरचा विकास कोण करु शकतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजी आढळराव, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद करु शकतात. असं म्हणत असताना अजित पवार यांनी महायुती सरकारमधील दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उल्लेख मात्र टाळला. मंचरमध्ये शिवसेना शिंदे गटासोबत सामना असल्यानं अजित पवारांनी नामोल्लेख टाळत एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.
advertisement
शरद पवारांबद्दल काय म्हणाले अजित पवार?
दुसरीकडे, अजित पवार यांनी शरद पवारांचं कौतुक केलं आहे. शरद पवारांनी अजित पवारांना दिलेल्या शिकवणीची त्यांना आठवण झाली आहे. "पवार साहेब नेहमी सांगायचे पुढच्या पंचवीस वर्षांचा विचार करून नियोजन करा. मंचरचा विकास आराखडा तयार करताना गरिबांच्या जागांवर आरक्षण टाकणार नाही, असंही अजित पवार म्हणाले.
"मंचर शहरात गोरगरीबांच्या जागांवर आरक्षण टाकणार नाही. पण जागेची खरेदी विक्री करणारे, जास्त जागा असणाऱ्यांच्या जागांवर आरक्षण टाकू, असं अजित पवारांनी सभेतून जाहीरपणे सांगितलं. यावेळी व्यासपीठावर बसलेल्या वळसे पाटलांनी मंचरमध्ये अशी जागा खरेदी विक्री होतं नाही, असं म्हटलं. यावर अजित पवारांनी मिश्किल टिप्पणी करत शेजारी बसणारा काय व्यवसाय करतो? हेच कळत नाही, असं म्हणत जागांच्या खरेदी विक्री करणाऱ्यांवर भाष्य केलं. तसेच त्यांनी शरद पवारांचा उल्लेखही केला. पवार साहेब नेहमी सांगायचे पुढची पंचवीस वर्षांचा विचार करून नियोजन करा, अशी आठवण अजित पवारांनी सांगितली.
