या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून घरोघरी अजितदादांनी मावळचा केलेला विकास तसेच मावळसाठी दिलेला कोट्यवधीचा निधी याबाबत पत्र छापून पोहोचवण्याची मोहीम राबवली जाणार आहे. कोणताही गाजावाजा, वाजंत्री, ढोलताशे घोषणाबाजी किंवा आक्रमक प्रचार न करता, साधेपणाने नागरिकांपर्यंत पोहोचण्यावर भर देण्यात येणार आहे.
विकासकामांची माहिती देणे हाच प्रचाराचा मुख्य उद्देश
पक्षाकडून फक्त मतदारांना भेटून संवाद साधणे, विकास कामांचे पत्रक मतदारांना देणे आणि अजितदादांनी मावळ तालुक्यासाठी केलेल्या विकासकामांची माहिती देणे हा प्रचाराचा मुख्य उद्देश असल्याचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांनी दिली आहे.
advertisement
अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या भावनेतून लढवली जाणार
घड्याळाला मत म्हणजे विकासाला मत या संदेशासह ही निवडणूक अजितदादांना श्रद्धांजली अर्पण करण्याच्या भावनेतून लढवली जात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस मावळ तालुका पक्षश्रेष्ठींनी स्पष्ट केले आहे.
निकालानंतर कोणताही जल्लोष होणार नाही
तसेच, निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांनी देखील कोणताही जल्लोष न करता हा विजय हा अजितदादांना समर्पित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एकंदरीतच, शांत, संयमित आणि विकासकेंद्रित प्रचाराच्या माध्यमातून मावळ तालुक्यातील निवडणूक पुढे नेण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धार केलेला आहे.
