या रनवेवर उतरणाऱ्या आणि टेकऑफ घेणाऱ्या विमानांना,मुंबई ATCवर अवलंबून राहावे लागते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाचं अधिकृत एअर ट्रॅफिक कंट्रोल युनिट,या बारामतीत नाही. या विमानतळावरील हवाई वाहतूक व्यवस्थापन विमान प्रशिक्षण संस्थेकडून केलं जातं. प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांकडून हवाई वाहतुकीची माहिती दिली जाते. धावपट्टीवरील दृष्यमानतेवरच विमानाचं टेकऑफ आणि लँडिंग केलं जातं. या अपघातानंतर भारतीय हवाई दलानं तिथे तात्पुरते ATC टॉवर आणि हवामान सेवा केंद्र उभारलंय.
advertisement
बारामतीचं एअरपोर्ट तांत्रिक दृष्ट्या अपूर्ण
बारामतीचं एअरपोर्टवर स्वतःचं ATC (AIR TRAFFIC CONTROL) नाही. याच एअरपोर्ट वरील रनवे अर्थात धावपट्टी ,तांत्रिक दृष्ट्या अपूर्ण नाही. दिवसा जरी दृश्यमानता कमी असेल तरी रनवेच्या दोन्ही बाजूस, रनवे दिसण्यासाठी कोणतेही लाइट्स नाही. याच एअरपोर्ट वर दोन एव्हिएशन स्कूल विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. धक्कादायक माहिती म्हणजे बारामतीमध्ये मोठ्या शहरातील या एअरपोर्टवर कायमस्वरूपी आणि व्यावसायिक ATC सिस्टीमच नाही.स्थानिक फ्लाइंग क्लबच्या माध्यमातून रेडिओवर संपर्क साधला जातो. या रनवेवर उतरणाऱ्या आणि टेकऑफ घेणाऱ्या विमानांना मुंबई ATC वर अवलंबून राहावे लागते. कोणत्याही वैमानिकासाठी तांत्रिक दृष्ट्या हा अवघड टास्क असतो.
बारामती विमानतळ हे एक 'अनकंट्रोल्ड' विमानतळ आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण अर्थात (AAI) चं कोणतंही अधिकृत एअर ट्रॅफिक कंट्रोल (ATC) युनिट,या विमानतळावर नाही. या विमानतळावर हवाई वाहतूक व्यवस्थेचं व्यवस्थापन विमान प्रशिक्षण संस्था करतात. रेडबर्ड एव्हिएशन आणि कार्व्हर एव्हिएशन या दोन खाजगी व्यावसायिक कंपन्यांकडे बारामती विमानतळ आहे.
एअर ट्रॅफिकची माहिती बारामती एअरपोर्टर कोण देते?
धक्कादायक म्हणजे,या दोन्ही संस्थांचे प्रशिक्षक किंवा छात्र वैमानिक आळीपाळीने एअर ट्रॅफिक माहिती देण्याचे काम करतात या विमानतळावर फक्त एक छोटा अॅडव्हायझरी टॉवर आहेय 129.25 MHz या फ्रीक्वेंसीवर कार्यरत या टॉवरद्वारे, वैमानिकांना धावपट्टीची स्थिती आणि हवामानाबद्दल फक्त माहिती दिली जाते. कोणताही अधिकृत आदेश दिले जात नाहीत
बारामती हे राजकीय दृष्ट्या अत्यंत वजनदार राजकीय नेत्यांचं शहर आहे. बारामती शहरातील विमानतळ अक्षरशः वाऱ्यावर आहे. या विमानतळावर उतरणारी आणि टेकऑफ घेणारी विमानं ही 'व्हिज्युअल फ्लाईट रूल्स' नुसार उडवली जातात. म्हणजे वैमानिकांना स्वतःच्या नजरेने धावपट्टी बघून आणि एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखून लँडिंग करावे लागते. या अपघातानंतर राज्य सरकारला जाग आली आहे.
भारतीय हवाई दल अर्थात IAF ची मदत घेतली आहे. महाराष्ट्र सरकारच्या विनंतीवरून भारतीय हवाई दल अर्थात IAF नं तिथे तात्पुरते ATC टॉवर आणि हवामान सेवा केंद्र उभारले. या विमानतळाचा वापर हा प्रामुख्यानं पायलट प्रशिक्षण आणि खाजगी विमानांसाठी वापरला जाते. बारामतीहून दररोज कोणतीही नियमित व्यावसायिक किंवा प्रवासी विमान सेवा नाही. मात्र, प्रशिक्षण देणाऱ्या विमानांची या विमानतळावर दररोज मोठी ट्रॅफिक आहे
'अकॅडमी ऑफ कार्व्हर एव्हिएशन' आणि 'रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी' यांसारख्या संस्थांची प्रशिक्षण विमाने दिवसभर उड्डाणे करतात यामुळे लहान विमानांचे टेक-ऑफ आणि लँडिंग मोठ्या संख्येनं या विमानतळावर होते.
