मिळालेल्या माहितीनुसाार, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी इथं राहणारे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुदाम बोडके (वय 63) यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झााल्याची माहिती समोर आली आहे. २८ जानेवारी रोजी अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात निधन झालं. सुदाम बोडके हे आपल्या एका नातेवाईकाच्या दशक्रिया विधीच्या कार्यक्रमाला गेले होते. अजितदादांच्या निधनाची बातमी समजताच बोडके यांना मोठा धक्का बसला. दादांच्या निधनामुळे सोबत असलेले कार्यकर्ते भावुक झाले होते. यावेळी दशक्रिया विधीच्या कार्यक्रमात अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत बोडके भरपूर बोलले होते.
advertisement
त्यानंतर ते नाशिकला आपल्या दुचाकीवर आले. मार्केट यार्ड परिसरात आाल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यांना ताातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं. पण, बोडके यांची प्रकृती आणखी खालावली होती. डॉक्टरांनी लगेच उपचार सुरू केले पण त्यांना वाचवण्याचा बराच प्रयत्न केला, पण बोडके यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केलं.
कोण होते बोडके?
सुदाम बोडके हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी इथं राहणारे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते होते. अजितदादांचे ते कट्टर समर्थक होते. राष्ट्रवादीच्या प्रत्येक कामासाठी ते हजर राहत होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात ते सक्रिय होते. त्यांच्या परिसरात राष्ट्रवादीसाठी त्यांनी भरिव असं काम केलं होतं. सुदाम यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना आणि नातवंड असा परिवार आहे. बोडके यांच्या निधनामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
