अजित पवारांचे स्वप्न काय होते?
२०१० पासून आतापर्यंत अजित पवार यांनी सहा वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून काम केले. परंतु मुख्यमंत्री होण्याची त्यांची इच्छा अद्याप पूर्ण झालेली नाही. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना मुख्यमंत्री बनवण्याची मागणी केली होती. त्यांनी या मागणीला पाठिंबा देण्यासाठी पोस्टर आणि बॅनरही लावले होते.
advertisement
गेल्या वर्षी अजित पवार यांनी त्यांची इच्छा पुन्हा व्यक्त केली. गेल्या वर्षी महाराष्ट्र दिनी,अजित पवार यांनी पुन्हा मुख्यमंत्री होण्याची त्यांची मनापासून इच्छा व्यक्त केली होती. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की त्यांना अद्याप मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली नाही, परंतु भविष्यात हे स्वप्न पूर्ण होऊ शकते. असं विधान हे त्यांनी त्यावेळी हे विधान केले.
अजित पवार काय म्हणाले?
खरं तर, महाराष्ट्र दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (NCP) "वैभवशाली महाराष्ट्र" नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता. समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. एका पत्रकाराने महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री असावी असे सुचवले तेव्हा अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, "आजकाल, मलाही अनेकदा वाटते की मी मुख्यमंत्री व्हायला हवे होते, पण संधी अजून आलेली नाही. कदाचित ती संधी कधीतरी येईल." अजित पवारांच्या विधानाने कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांमध्ये हशा पिकला होता.
अजित पवारांचा विमान अपघात
दरम्यान, बुधवारी सकाळी पुणे जिल्ह्यात झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर चार जणांचा दुःखद मृत्यू झाला. ही घटना महाराष्ट्रासाठी हा एक मोठा धक्का आहे.
