TRENDING:

लाडका होता तो.... बारामतीत पाय ठेवताच सुप्रिया सुळेंनी टाहो फोडला, अजित पवारांचे लाड करणाऱ्या मणियार यांच्यासमोर धाय मोकलून रडल्या

Last Updated:

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि रोखठोक नेते अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या बातमीने अनेकांना धक्का बसला असून अनेकांना अश्रू अनावर झाले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे : बारामतीत अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू (Ajit Pawar Passes Away)  झाला. अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. आज अजित पवार बारामती दौऱ्यावर होते. बारामतीत लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. बारामतीत आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्त अजित पवारांच्या सभा आयोजित करण्यात आली होती.
News18
News18
advertisement

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि रोखठोक नेते अजितदादा पवार यांच्या मृत्यूच्या बातमीने अनेकांना धक्का बसला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भावना अनावर झाल्या आहेत. अनेक नेत्यांच्या तोंडून शब्दही फुटेनासे झाले आहेत. अनेकांना अश्रू अनावर झाले आहेत. बारामतीमधील वातावरण शोकाकूल झाले आहे. अनेकांसाठी हा जबरी धक्का आहे. पवार कुटुंबियांना आणि बारामतीकरांना पोरकं झाल्यासारखं वाटत आहे. दरम्यान लाडक्या दादाचं विमान अपघातात मृत्यू झाल्याची वार्ता कळताच खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा धक्का बसला आहे.

advertisement

सुप्रिया सुळेंचा आक्रोश काळीज पिळवटणारा

अजितदादांच्या निधनाची बातमी समजल्यानंतर पत्नी सुनेत्रा पवार, जय पवार आणि खासदार सुप्रिया सुळे दिल्लीहून बारामतीत दाखल झाले. विमानतळावर पोहोचल्यावर सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे यांना अश्रू अनावर झाले. विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणी शरद पवार यांचे जुने सहकारी मित्र विठ्ठल शेठ मणियार उभे होते त्यांना पाहून सुळे आणि पवार यांना अश्रू अनावर झाले. विठ्ठल शेठ मणियार हे अजित पवारांच्या अतिशय जवळचे  आहेत. अजित पवार लहान असल्यापासून मणियार यांचे ते लाडके होते.  सुप्रिया सुळेंनी लाडका होता तो... काय झालं असं म्हणत टाहो फोडला. सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनाही अश्रू अनावर झाले. पवार कुटुंबांना पाहून यावेळी उपस्थितीत लोकांच्याही डोळ्यात पाणी आलं.

advertisement

'अजितदादा अमर रहे'च्या घोषणा

दरम्यान यावेळेस विमानतळावर राणा जगजित सिंह पाटील नेण्यासाठी आले होते. यावेळी जयंत पाटील, दादा भुसे होते. विमानतळातून बाहेर पडल्यानंतर पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार बारामती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. यावेळी पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांना पाहताच कार्यकर्त्यांनी 'अजितदादा अमर रहे'च्या घोषणा दिल्या. त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुंबईतून बारामतीत हेलिकॉप्टरने दाखल झाले होते.

advertisement

नेमका कसा झाला अपघात?

आजित पवारांच्या विमानाचा अपघात बारामती एअरपोर्ट पासून दोन ते तिन किलोमीटर अंतरावर झाला. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लँड होऊ शकले नाही. एअरपोर्ट पासून पुढे दोन ते तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात आदळलं. विमान कोसळताच क्षणार्धात भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि जळून खाक झालं. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरले.

advertisement

महाराष्ट्राने लाडका नेता गमावला

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
निवडून आलीस, 10 दिवसांपूर्वीच झाली होती अजितदादांची भेट; वर्षा यांना अश्रू अनावर
सर्व पहा

अजित पवारांच्या अपघाती निधनाची बातमी समजल्यानंतर कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यभरातून कार्यकर्ते बारामतीमध्ये दाखल झाले आहेत. आपला लाडका नेता गेल्यानं सर्वांना धक्का बसला आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
लाडका होता तो.... बारामतीत पाय ठेवताच सुप्रिया सुळेंनी टाहो फोडला, अजित पवारांचे लाड करणाऱ्या मणियार यांच्यासमोर धाय मोकलून रडल्या
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल