अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात 8.50 मिनिटांनी झाला. हवेत दोनवेळा गिरट्या घातल्या, मात्र लॅण्डिंग करण्यात अडचणी येत होत्या. मेडे कॉलही देण्यात आला होता. काही क्षणात भयंकर स्फोट झाला. या स्फोटाची माहिती स्थानिकांनी तातडीनं पोलिसांना दिली. विमान लॅण्डिंग होण्याआधीच त्याचा हवेत स्फोट झाला. विमानाचे तुकडे तुकडे झाले. आगीच्या ज्वाळा भयंकर होत्या. त्यामुळे तिथपर्यंत पोहोचणंही शक्य नव्हतं. जवळपास 15-20 मिनिटांचा थरार प्रत्यक्षदर्शिंनी डोळ्यादेखत पाहिला.
advertisement
अपघातावर पोलिसांची पहिली प्रतिक्रिया
ही धक्कादायक घटना साडेनऊच्या आसपास घडली आहे. ज्यावेळी प्लेन लॅण्डिंगसाठी येत होते त्या ठिकाणी हा अपघात झाला. विमानात काही दोष होता की मॅन्युअल काही चूक झाली याची माहिती सध्या सांगता येत नाही. ते तपासानंतर आम्ही तुम्हाला देऊ. विमान अपघातात पाच मृतदेह सापडले आहेत. त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. त्यांची ओळख पटल्यानंतर नाव कळवण्यात येतील. ब्लॅक बॉक्स एक्सपोर्ट टीम येऊन कलेक्ट करणार आहे.
हे विमान ८ च्या दरम्यान निघालं होतं आणि पावणे नऊच्या आसपास इथे पोहोचलं होतं. घटना घडल्यानंतर आम्ही तिथे जाऊन रेस्क्यू केलं. विमानाच्या मलब्यामधून डेडबॉडी काढून हॉस्पिटलला पाठवण्यात आल्या होत्या. चार्टर्ड लॅण्ड होण्याआधीच विमानाचा अपघात झाला होता. मेडेचा कॉल दिला होता का यावर एक्सपर्ट्स बोलू शकतील. जमिनीवर विमान लॅण्ड होण्याआधीच विमानाचा स्फोट झाला होता.
