आता या अपघाताबाबत अजित पवारांच्या फार्म हाऊसवरून मन सुन्न करणारा प्रसंग समोर आला आहे. ज्यावेळी अपघात घडला त्याच्याआधी काही वेळापूर्वीपासून अजित पवारांच्या आई आशाताई पवार टीव्ही पाहत बसल्या होत्या. याच वेळी अचानक अजित पवारांच्या अपघाताची बातमी टीव्हीवर झळकली. यानंतर पुढे काय घडलं, याबाबतचा सविस्तर प्रसंग फार्म हाऊसवरील मॅनेजर संपत धायगुडे यांनी सांगितला आहे. त्यांनी दिव्य मराठीशी बोलताना हा प्रसंग सांगितला.
advertisement
संपत धायगुडे यांनी नक्की काय सांगितलं?
संपत धायगुडे यांनी सांगितलं की, सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे अजितदादांच्या आई फार्म हाऊसवरती टीव्ही पाहत होत्या. त्यांना नाश्ता देण्याची तयारी करत होतो. त्यानंतर सकाळी साडेआठ वाजता अजितदादांच्या विमान अपघाताची बातमी टीव्हीवर येत होती. आईंनी लगेच आम्हाला विचारले 'अरे दादांचा अपघात झालाय का?' पण आईलाही वाटले त्यांना खरचटले असेल काही झाले नसेल.
फार्महाऊसच्या बाहेर चालतच निघाल्या..
पुढे संपत धायगुडे सांगतात की, बारामतीत हॉस्पिटलमध्ये दादांना आणल्याची टीव्हीवरून बातमी आली. त्यावेळी आम्ही लगेच आईला पुढच्या बातम्या कळू नयेत, यासाठी बंगल्यावरील टीव्हीची केबल तोडली आणि टीव्ही बंद पडल्याचे सांगितले. त्यांचा मोबाईलही फ्लाईट मोडवर टाकून दिला. काही झाले नसल्याचे आम्ही त्यांना सांगत होतो. पण दादांना भेटून येऊ चला असे म्हणून त्या फार्महाऊसच्या बाहेर चालतच निघाल्या होत्या. ड्रायव्हरने गाडी बंद पडल्याचेही सांगितले. पण त्या ऐकल्या नाहीत. शेवटी नाईलाजाने त्यांना आम्ही बारामती येथील बंगल्यावर घेऊन गेलो, अशी माहिती संपत धायगुडे यांनी दिली आहे.
