जिल्हा परिषदेच्या निवडणुका काही दिवसावर येऊन ठेपल्या आहेत, त्याच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला जात होते. त्यावेळी लँडिंगच्या काही मिनिटांपूर्वी पवारांच्या चार्टर्ड विमानाला अपघात झाला. अजित पवारांसह पाच जणांचा या अपघातात मृत्यू झाला. बारामतीत झालेल्या विमान अपघातामागील प्रमुख कारण खराब हवामान आणि कमी दृश्यमानता मानली जात आहे. अपघातावेळी बारामतीमधील धावपट्टीच्या परिसरात दाट धुकं होतं. त्यामुळे दृश्यमानता जवळपास ८०० मीटर इतकीच होती. या प्रतिकूल स्थितीत वैमानिकानं विमान उतरवण्याचा प्रयत्न केला, तो अपयशी ठरला.
advertisement
नेमका काय घडलं पायलटसोबत?
- बारामतीमधील धावपट्टीवर नाईट लँडिंगची सुविधा नाही. त्यामुळे दाट धुक्यात आणि कमी दृश्यमानतेच्या स्थितीत लँडिंग अतिशय धोकादायक झालं. धावपट्टीवर नाईट लँडिंगची सुविधा असती, तर विमानाच्या लँडिंगला मदत झाली असती. चार्टर्ड विमान सुरक्षित उतरण्याची शक्यता वाढली असती.
- बारामती हे एक अनियंत्रित विमानतळ आहे, जिथे वाहतूक माहिती उड्डाण प्रशिक्षण संस्थांमधील वैमानिक/प्रशिक्षकांकडून दिली जाते. विमानाने बारामतीशी पहिला संपर्क 8 वाजून 18 मिनिटानी संवाद साधला. पुणे अॅप्रोचने विमानाला 30 नॉटिकल मैल अंतरावर सोडले.
- बारामतीमधील धावपट्टीच्या परिसरात दाट धुकं होतं. त्यामुळे दृश्यमानता जवळपास ८०० मीटर इतकीच होती. या प्रतिकूल स्थितीत पायलटला त्याच्या स्वतःच्या विवेकबुद्धीनुसार खाली उतरण्याची परवानगी देण्यात आली.
- फेरी मारल्यानंतर, पुन्हा अंतिम फेरी मारण्यात आली. सुरुवातीला धावपट्टी दिसत नसल्याची नोंद करण्यात आली होती, परंतु नंतर धावपट्टी दृश्यमान असल्याचे करण्यात आली.
- धावपट्टी 11 साठी लँडिंग क्लियरन्स ८.४३ IST वाजता देण्यात आला, परंतु रीडबॅक मिळाला नाही.
- धावपट्टी ११ च्या उंबरठ्याजवळ ०८४४ IST वाजता ज्वाला दिसल्या.
- आपत्कालीन सेवा ताबडतोब अपघातस्थळी पोहोचल्या.
- विमानाचे अवशेष रनवे ११ च्या डाव्या बाजूला, उंबरठ्याजवळ आढळले.
धावपट्टी दिसत नसल्याने धावपट्टी ११ वर जाण्यासाठी पहिल्या अंतिम मार्गावर एक फेरी मारण्यात आली.
नेमका कसा झाला अपघात?
अजित पवारांच्या विमानाचा अपघात बारामती एअरपोर्ट पासून दोन ते तिन किलोमीटर अंतरावर झाला. विमानात ऐनवेळी झालेल्या बिघाडामुळे विमान धावपट्टीवर लँड होऊ शकले नाही. एअरपोर्ट पासून पुढे दोन ते तिन किलोमीटर अंतरावर असलेल्या उतारावरील जमिनीवर जाऊन हे विमान कोसळले. तांत्रिक बिघाडामुळे विमान धावपट्टीवर उतरण्याऐवजी शेजारी असलेल्या एका शेतात आदळलं. विमान कोसळताच क्षणार्धात भीषण पेट घेतला. बघता बघता संपूर्ण विमान आगीच्या भक्ष्यस्थानी आलं आणि जळून खाक झालं. या अपघातानंतर घटनास्थळावरून धुराचे मोठे लोट पसरले.
